computer

बिबट्या ३५०००, झेब्रा ५०,००० तर वाघ १ लाख रुपये....आता तुम्हालाही प्राणी दत्तक घेता येणार !!

गाव दत्तक घेतल्याच्या बातम्या तर तुम्ही ऐकल्या असतीलच, पण आता तुम्हाला चक्क वन्यप्राणी दत्तक घेता येणार आहेत. हा उपक्रम बंगळूरच्या बेन्नरघट्टी बायोलॉजिकल पार्कने सुरु केला आहे. विशेषतः लॉकडाऊनच्या काळात वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी हा उपक्रम तयार करण्यात आला आहे.

बेन्नरघट्टी बायोलॉजिकल पार्कचे डायरेक्टर वनश्री विपिन सिंघ म्हणतात की ‘लोकांमध्ये वन्य प्राण्यांविषयी जागृती निर्माण व्हावी आणि प्राणी संवर्धनासाठी काम करत असलेल्या व्यक्तींना जोडण्यात यावं हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

दत्तक घेण्यासाठी जे पैसे आकारले जात आहेत त्यांचं काय होणार?

दत्तक घेण्यासाठी जे पैसे आकारले जातील ते प्राण्यांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या अन्नासाठी खर्च केले जातील. दत्तक घेणाऱ्याला आयकर कायद्याच्या 80G अंतर्गत सूट दिली जाईल. एवढंच नाही तर गिफ्ट वाऊचर्स मिळणार आहेत आणि दत्तक घेतल्याबद्दल फलकावर नावही लिहिलं जाईल. या गोष्टी दत्तक घेण्याच्या रकमेवर अवलंबून आहेत.

आता कोणते प्राणी किती रुपयांमध्ये दत्तक घेता येतील ते पाहूया...

नाग आणि अजगर : ३५००

रानमांजर आणि आसामी मकाक (माकड) : ५०००

काळवीट आणि सांबर : ७५००

इमू : १०,०००

पिवश्या ढोक पक्षी : १५,०००

सोनेरी कोल्हा : २०,०००

भारतीय बिबट्या आणि अस्वल : ३५,०००

झेब्रा : ५०,००००

पाणघोडा : ७५,०००

वाघ आणि जिराफ : १,००,०००

वाचकहो, बंगळूरच्या या प्राणीसंग्रहालयाचं वार्षिक उत्पन्न १५ लाख एवढं होतं. लॉकडाऊनमुळे प्राणीसंग्रहालय बंद आहे आणि याचा फटका अप्रत्यक्षपणे प्राण्यांना बसणार आहे. म्हणूनच दत्तक घेण्याचा उप्रक्रम महत्त्वाचा ठरू शकतो. मग तुम्ही एखादा प्राणी दत्तक घेणार का? असाच उपक्रम महाराष्ट्रातल्या प्राणीसंग्रहालयात सुरु करावा का?

सबस्क्राईब करा

* indicates required