computer

३० ते‌ ४० हजारात मिळणारे सर्वोत्तम स्मार्ट टिव्हीज : खरेदी करण्यापूर्वी ही माहिती वाचायलाच हवी...

बाजारात सध्या ढिगभर टिव्ही ब्रॅन्ड्स उपलब्ध आहेत. त्यामुळं टिव्ही खरेदी करताना गोंधळायला होतं. म्हणूनच आज आम्ही घेऊन‌ आलोय ३० ते ४० हजारांत मिळणाऱ्या सर्वोत्तम स्मार्ट टिव्हीजची यादी. कोणता टिव्ही खरेदी करावा, हे ठरवणं आता अधिक सोपं होईल.

Motorola 43SAUHDM

आजकाल बऱ्याच स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या टेलिव्हिजन निर्मीती क्षेत्रातही उतरल्या आहेत. त्यापैकीच जगप्रसिद्ध मोटोरोला ही एक.

किंमत - २७,९९९ रूपये

डिझाइनच्या बाबतीत टिव्हीची बिल्ड क्वॉलिटी मजबूत आहे. या टीव्हीसोबत १० वॅटचे २ स्पिकर्स येतात.

या टिव्हीला ६० Hz चा रिफ्रेश रेट असणारा ४३ इंचाचा UHD 4K LED डिस्प्ले देण्यात आलाय. हा डिस्प्ले HDR10 सर्टिफाईड आहे. डॉल्बी व्हिजन, ॲडाप्टिव्ह लाईट कंट्रोल, नॉईस रिडक्शन, स्क्रिन डिमींग आणि कलर ॲक्युरसीसारख्या वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला हा टिव्ही एक सुंदर‌ अनुभव देईल.

Android 9.0 Pie ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा हा टिव्ही नेटफ्लिक्स, प्राईम, यूट्यूब आणि इतर ॲप्सना सपोर्ट करतो. यात Quad Core प्रोसेसरसह १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटर्नल मेमरी दिलेली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ३ HDMI पोर्ट आणि २ USB पोर्ट मिळतात. शिवाय यात इंटरनेट जोडणीसाठी RJ45 पोर्टही दिला गेलाय. कमी बजेटमध्ये हा स्मार्ट ॲन्ड्रॉईड टिव्ही तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Vu Premium 50 Inch 4K Smart LED TV

Vu हि भारतीय महिला उद्योजक देविता सराफ यांनी स्थापन केलेली अमेरिकेत हेडक्वार्टर असलेली टिव्ही निर्मिती कंपनी आहे. भारतात ऑनलाईन मार्केटमध्ये सर्वाधिक 4K टिव्ही विक्री करण्याचा मान Vu ला जातो.

किंमत - २९,९९९ रूपये

या टिव्हीला ५० इंची Ultra HD 4K LED डिस्प्ले दिला आहे आणि तो ६०‌ Hz च्या रिफ्रेश रेटसोबत येतो. डॉल्बी व्हिजन आणि HDR10 चा सपोर्ट आणि HLG तंत्रज्ञानामुळं तुम्हाला या टीव्हीवर प्रत्येक चित्र एकदम मस्त आणि क्लिअर दिसतं.

हा टीव्ही Android 9.0 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यामध्ये तुम्ही युट्यूब, नेटफ्लिक्ससारखी ॲप्स आणि गुगल गेम्स, गुगल मुव्हिज अशा सुविधा तुम्ही वापरू‌ शकता. डॉल्बी डिजिटल प्लस आणि DTX VIRTUAL-X Surround Sound मुळं आवाजाची गुणवत्ताही चांगली मिळते. यात टिव्हीत‌ क्रिकेट पाहाण्याचा एक उत्तम अनुभव देईल असा क्रिकेट मोडही आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ३ HDMI पोर्ट, २ USB पोर्ट आणि वायफाय, इथरनेट जोडण्याची सुविधा मिळते.

Vu 50CA Android Smart TV

कमी किंमतीमध्ये मिळणाऱ्या अधिकाअधिक फिचर्समुळं या यादीत Vu च्या या टिव्हीचाही समावेश होतो.

किंमत - ३६,९९० रूपये

या टिव्हीला ५० इंचाचा UHD 4K डिस्प्ले दिला आहे आणि ५० इंची 4K स्क्रिन असणारा हा एक स्वस्त टिव्ही आहे. हा डिस्प्ले HDR 10 सर्टिफाईड असून याचा रिफ्रेश रेट ६० Hz चा आहे. या टिव्ही स्क्रिनच्या कडा या अगदी लहान आहेत. त्यामुळं डिस्प्ले आकर्षक दिसतो. मोठ्या आणि सुस्पष्ट आवाजासाठी यात २० वॅटचे दोन स्पिकर्स येतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात ३ HDMI पोर्ट, २ USB पोर्ट, वायफाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीही दिलेली आहे.

Android ऑपरेटिंग सिस्टम असल्यामुळे एका चांगल्या स्मार्ट टिव्हीचा अनुभव इथे मिळतो. युट्यूब, नेटफ्लिक्स अशी ॲप्स यात प्रिलोडेड आहेत. प्ले स्टोअर असल्याने हवी ती ॲप्स इन्स्टॉल करता येतील. स्मार्टफोनद्वारे तुम्ही हा टिव्ही तुम्ही कंट्रोल करू शकता.

Samsung Super 6

किंमत - ३६,९९९ रूपये

या टिव्हिला ४३ इंचाचा Ultra HD 4K डिस्प्ले दिला गेलाय. यामध्ये सॅमसंगचं Hyperreal Picture Engine तंत्रज्ञान वापरलेलं आहे ज्यामुळं उत्तम कलर आणि कॉन्ट्रास्ट पहायला मिळतात. ६० Hz च्या रिफ्रेश रेटमुळं जलदगतीने बदलणारं चित्रही सुस्पष्ट दिसतं. कनेक्टिव्हिटीसाठी यात २ HDMI पोर्ट, १ USB पोर्ट आणि इंटरनेट जोडण्यासाठी वायफाय व इथरनेट पोर्ट दिलेला आहे. यामध्ये स्क्रिन मिररिंगची सुविधाही आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरचे फोटो, व्हिडीओ थेट टिव्ही स्क्रिनवर पाहू शकता.

या टिव्हीला युट्युब, नेटफ्लिक्स, प्राईम, डिस्ने+हॉटस्टार या ॲप्सचा सपोर्ट असल्यानं तुम्ही ऑनलाईन व्हिडीओ, चित्रपट, वेब सिरीज पाहण्याचा आनंदही घेऊ शकता.‌ पण यामधली ऑपरेटिंग सिस्टम ही Android नसून Tizen आहे. यामध्ये १० वॅटचे दोन स्पिकर्स दिलेले आहेत.

ONIDA 55UIB1

ओनिडा ही एक सुप्रसिद्ध भारतीय होम अप्लायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स निर्माती कंपनी आहे.

किंमत - ३९,३९० रूपये

महागड्या टिव्हीसारखीच वैशिष्ट्ये असलेला हा एक स्वस्त आणि डिझाईनच्या बाबतीत अत्यंत आकर्षक असा हा टिव्ही आहे. अतिशय लहान बेझल्स आणि स्टिल फिनीशींग आणि मजबूत बॉडी यामुळं हा टिव्ही 'व्हॅल्यू फॉर मनी' ठरतो. या टिव्हीला ५५ इंचांचा Ultra HD 4K डिस्प्ले ६० Hz च्या रिफ्रेश रेटसोबत दिला आहे. हा डिस्प्ले HDR10 सर्टिफाईड आहे आणि त्यात १.०७ बिलीयन म्हणजेच १०७ कोटी कलर्स दिसतात. जगात इतके कलर्स खरंच अस्तित्वात आहेत?

DOLBY सराऊंड साऊंडच सपोर्टही यात असून ८‌ वॅटचे दोन स्पिकर्स दिलेले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ३ HDMI पोर्ट आणि २ USB पोर्ट मिळतात. VGA पोर्ट असल्यानं तुम्ही तुमचा लॅपटॉपही टिव्हीला कनेक्ट करून वापरू शकता. यात‌ Quad Core ARM प्रोसेसर आणि स्टॉक‌ ॲन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम असल्यानं अगदी स्मुथ अनुभव‌ मिळतो. गुगलचं प्ले स्टोअर आणि प्ले सर्व्हिस असल्यानं हवी ती व्हिडीओ स्ट्रिमींग ॲप्स तुम्ही यात इन्स्टॉल करू शकता.

तर मंडळी, एकेकाळी हजारो रुपये मोजाव्या लागणाऱ्या या टीव्हींची किंमत पुष्कळच कमी झालीय. तुम्हांला या यादीतला कोणता टीव्ही घ्यावा वाटेल आणि का? आम्हांला नक्की सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required