computer

पक्षी अस्तित्वातच नाहीत? अमेरिकेत ही नवीन अफवा कोणी पसरवली?

सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार आहे. सोशल मीडियामुळे तुम्हाला जगाशी जोडून घेता येते. नविन माहिती मिळते. पण याच सोशल मीडियावर अनेक चुकीच्या गोष्टी पण घडतात. सोशल मीडियावर चुकीची माहिती देण्याचा प्रकार पण मोठा आहे. इथे एखाद्या विषयावर बोलायला त्या विषयावर अभ्यास असणे गरजेचे नाही. सध्या सोशल मीडियावर कॉन्स्पिरसी थियरीजची चलती आहे. कॉन्स्पिरसी थियरीज म्हणजे काय? तर, आधी पारावर बसून लोक इकडच्या तिकडच्या गोष्टी एकत्र करून कुठलीही गोष्ट ढापुन द्यायचे असेच काहीसे. मग अशी गोष्ट जास्त लोकांपर्यंत पसरली की लोकांना खरे वाटायला लागायचे.

आज हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे सध्या अमेरिकेत नवी थियरी हिट होऊ पाहत आहे. ती म्हणजे पक्षी अस्तित्वात नसतात आणि आकाशात जे दिसतात ते लोकांवर लक्ष ठेवायला असणारे ड्रोन आहेत. 

या थियरीनुसार खऱ्या पक्षींना ठार मारण्यात आले असून सध्या जे आकाशात पक्षी दिसतात ते पक्षांच्या रूपाने सरकारचे ड्रोन आहेत. ही कल्पना किंवा थियरी Peter Mcindo नावाच्या माणसाने शोधून काढली आहे. २०१७ साली त्यांनी पहिल्यांदा ही गोष्ट बोलून दाखवली. नंतर त्यांनी आपल्याला दाव्याची सत्यता सिद्ध करण्यासाठी अनेक तर्क मांडले. यासाठी त्यांनी एक रॅली सुद्धा काढली होती. 

इथपर्यंत ठीक होते, पण त्यांना रेडीटवर तब्बल ३६,००० लोकांचे समर्थन मिळाले आहे. हे पक्षी जेव्हा विजेच्या खांबांवर बसतात तेव्हा ते स्वतःला चार्ज करत असतात, असाही त्याचा दावा आहे.

पक्षी खरे नसतात ही गोष्ट आता अमेरिकेत वाऱ्यासारखी पसरत आहे. हळूहळू Peter mcindo यांचे समर्थक हजारांहुन लाखोंत गेले तर आश्चर्य वाटायला नको.

सबस्क्राईब करा

* indicates required