ठाण्यात भरतोय बिर्याणी महोत्सव....तारीख आणि पत्ता बघून घ्या राव !!

खवय्यांना सांगण्यास अत्यानंद होत आहे की ठाण्यात २३ ते २५ फेब्रुवारी पर्यंत बिर्याणी महोत्सव भरणार आहे भौ. ठाण्यातील जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात हा महोत्सव भरणार असून ३ दिवस १५ प्रकारच्या बिर्याणी इथे चाखायला मिळणार आहेत.

स्वराज्य इव्हेंन्टस संस्थे तर्फे बिर्याणी फेस्टीवलचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने दिल्ली बिर्याणी, हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, इटालियन बिर्याणी, मियॉनीज बिर्याणी, झमझम बिर्याणी तसेच नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी व्हेज बिर्याणी सुद्धा असणार आहे. बिर्याणी बरोबर विविध स्टार्टर्स आणि कबाबचे अनेक प्रकार देखील इथे असतील. मागील महिन्यात झालेल्या मिसळ महोत्सवाप्रमाणेच बिर्याणीचे अनेक प्रकार एकाच जागी आणण्याचा हा प्रयत्न आहे. 

स्रोत

शुक्रवारी म्हणजे उद्या संध्याकाळी या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. शनिवार आणि रविवारी असे २ दिवस संध्याकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत महोत्सव खुले राहील. जर तुम्हाला बिर्याणी तिथेच न खाता घरी न्यायची असेल तर तशी पार्सलची सोय सुद्धा असणार आहे.

यात भर म्हणून महोत्सवाच्या ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा असणार आहेत. म्हणजे डबल मज्जा राव. फेब्रुवारीची सांगता करण्यासाठी यापेक्षा मस्त प्लॅन काय असणार ?

तारीख : २३, २४ आणि २५
वेळ : संध्याकाळी ५ ते ११.
पत्ता : शिवाजी मैदानात, जांभळी नाका, ठाणे.

सबस्क्राईब करा

* indicates required