काय, चक्क तरंगता पूल? पाहाल तर किमान एकदा इथं जायचा प्लॅन तुम्ही नक्की कराल!

मंडळी, नदीवरचे आणि समुद्रावरचे पूल तर आपण खूप पहिले असतील. आपल्या देशातच पाहा ना, गोकाकला झुलता पूल आहे, तिकडे शिलाँगमध्ये जिवंत मुळांचा पूल आहे.. भारतातला सर्वात लांब रेल्वे पूल नुकताच तयार झालाय आणि लवकरच जगातला सर्वात उंचीवरचा रेल्वे पूल पण भारतात तयार होतोय. पण आज आम्ही एका वेगळ्या पुलाबद्दल बोलणार आहोत. हा पूल आहे चीनमधला तरंगता पूल. हा व्हिडिओ पाहा.
तसा २०१७ साली चीनने जगातील सर्वात लांब तरंगता रस्ता (५.१३ किलोमीटर) तयार करून जगाला धक्का दिला होता. हा रस्ता फुलपाखराच्या आकारात आहे. पाण्यावर एवढ्या मोठ्या लांबीचा तरंगणारा रास्ता आजवर कोणीही बांधला नव्हता.

पण मंडळी, हा रस्ता जगातला सर्वात लांब तरंगणारा मार्ग असला तरी त्याला सर्वात सुंदर म्हणता येणार नाही. आम्ही आज ज्या तरंगत्या पुलाबद्दल सांगणार आहोत त्याचा आकार लहान आहे पण तो आपल्या निसर्गसौंदर्याने जगातील सर्वात लांब तरंगत्या पुलाला टक्कर देतोय.
व्हिडीओत दाखवलेला पूल (किंवा walkway) हा चीनच्या हुबेई प्रांतातला आहे. २०१६ साली पूल बांधण्यात आला. या पुलाची लांबी केवळ ५०० मीटर आहे. पूर्वी नदी ओलांडण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नव्हता. आज या पुलामुळे माणसांबरोबरच वाहनंसुद्धा नदी सहज ओलांडू शकत आहेत. नदीचा प्रवाह हा डोंगर कडांमधून मार्ग काढत गेलेला आहे. या नैसर्गिक आकाराने हिरव्यागर्द पहाडांचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं. तरंगत्या पुलाचं कौतुक तर आहेच, पण निसर्गानेही या भागाला भरभरून सजवलंय. आपल्याकडे थ्री इडियट्स सिनेमा आल्यावर सगळेजण लेह-लडाखला जायला लागले होते. हा पूल पाह्यल्यावरही तिथं जायलाच हवं असं वाटतं.
अशा या तरंगत्या पुलाची निर्मिती करण्यासाठी लाकूड वापरण्यात आलंय असं वाटत तरी आहे का? हा पूल बांधण्यासाठी मुख्य साहित्य म्हणून लाकूड वापरण्यात आलंय.
चला तर आता फोटोंतून हा पूल आणखी जवळून पाहूया.

आणखी वाचा :
भारताने चीनच्या नाकावर टिच्चून तयार केलाय आसामचा पूल....वाचा ५ महत्वाच्या गोष्टी !!
हा पूल चक्क दोन हातांवर पेलला आहे ? कुठे आहे हा पूल ?
मेघालयात लोक बांधतात जिवंत पूल...!!!
भल्या भल्यांची हवा टाईट करणारा जगातला सगळ्यात लांब झुलता पूल आहे तरी कुठे ???
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बनणार भारतात....वाचा कुठे बनणार आहे हा पूल !!