गटारी पेश्शल- अंगूरकी बेटी -ग्रापा
प्रत्येक संस्कृतीत त्या संस्कृतीच्या मोठ्या देवदेवतांचा बोलबाला असतो तसाच इटलीच्या वाईनचा जगभर बोलबाला आहे, आणि ग्रापाला इटलीच्या ग्रामदेवतेचा मान आहे. द्राक्षापासून वाइन बनवण्याचा इटलीचा राष्ट्रीय वारसा दोन हजार वर्षे जुना आहे.इटलीत वाईन बनवणारे एकूण ३३० प्रदेश आहेत.दर दहा कोसाला जशी भाषा बदलते तशी इटलीत दर दहा कोसाला वाईनची चव बदलते.जगभर इटालियन वाईन निर्यात होते. पण मायदेशात त्या वाईन इतकीच लोकप्रिय असलेली दारू म्हणजे ग्रापा.
वाइन बनवताना द्राक्षाचा रस काढून झाल्यावर उरलेल्या चोथ्यातून या दारुची निर्मिती केली जाते. वाईनपेक्षा तिची ही बहीण कानामागून येऊन जरा जास्तच तिखट झालेली आहे. जवळ जवळ ४० ते ४५ टक्के मद्यार्क असलेली ही दारू एक विशिष्ट आकाराच्या ग्लासात जेवणानंतर प्यायली जाते. ग्रापा पिण्याची पण एक पध्दत आहे. ग्रापा पेल्यात थोडीशी गोल फिरवा , मग पेला नाकाशी घेउन ग्रापाचा सुगंध घ्या आणि छोट्या छोट्या घोटाने आस्वाद घ्या. ग्रापा प्यायल्यावर दहा हत्तींचे बळ अंगात येते आणि दुसर्या दिवशी हँगओव्हर पण दहा हत्तींशी झुंज दिल्यासारखाच येतो. आणि मग कॉफीत शास्त्रापुरती ग्रापा टाकून नव्या दिवसाची सुरुवात होते.
आणखी वाचा :
गटारी पेश्शल-व्होडका водка-फ्रॉम रशिया विथ लव्ह !!
गटारी पेश्शल: देशोदेशीच्या दारवा !!!
गटारी पेश्शल-'रम'ची रांगडी रंगत