मीशो - हे अॅप वापरून लोकांनी वापरून लाखो रुपये कमावले असं म्हणतात ! तुम्ही वापरलंय का मीशो ?
गेल्या काही वर्षात भारत हा स्टार्ट-अप उद्योगात चीन आणि अमेरिका सारख्या बलाढ्य राष्ट्रांना मागे टाकत जागतिक यादीमध्ये तिसऱया क्रमांकांवर आला आहे. करोना काळात कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला ऑनलाइन व्यवसाय वरदान ठरली,त्यावेळी पर्याय म्हणून काढलेला हा मार्ग आता नेहमीच्या सवयीचा झालाय. कपडे,औषध,दागिने,बँकिंग एक नाही तर अनेक गोष्टींसाठी आपण आज ऑनलाईन ऍप सहज वापरतो अशाच एका ऑनलाईन उद्योगाची जन्म कथा आज आपण जाणून घेऊ जिचं नाव आहे "'मीशो".
मीशो म्हणजे 'मेरी शॉप किंवा अपनी दुकान'.मिशो या भारतीय सोशल-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे संस्थापक विदित अत्रे आणि संजीव बर्नवाल हे दोन आआयटी दिल्लीचे पदवीधर विद्यार्थी आहेत. या दोघांनी डिसेंबर २०१५ मध्ये मीशो नावाच्या स्टार्टअपची स्थापना केली होती.त्यांच्याकडे त्याच नावाची ई-कॉमर्स वेबसाइट देखील आहे मीशो ऍप हे त्यांच्या ई-कॉमर्स साइटचे रूपांतर आहे. मीशोच्या स्थापनेपूर्वी हे दोघेही सोशल मीडियाच्या मदतीने ऑनलाइन पध्दतीने उत्पादनांची विक्री करत होते. त्यानंतर भारतातील ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड पाहून त्यांनी मीशो ऍप तयार केले. इतर इ-कॉमर्स अॅप आणि मीशोत फरक असा आहे की मीशो 'सोशल कॉमर्स' अॅप आहे.
मीशोचे व्यवसायाचे स्वरुप पुनर्विक्रीचे आहे.इथे सर्व प्रकारच्या कंपन्यांची घाऊक उत्पादने, मोठ्या आणि लहान प्रमाणात विकल्या जातात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, हे Amazon आणि Flipkart सारखाच एक इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणतेही सूचीबद्ध केलेली उत्पादने ऑनलाइन खरेदी करू शकता. मीशो ऍप मध्ये,तुम्हाला स्वस्त किमतीत चांगली उत्पादने मिळतात कारण त्यामध्ये सर्व वस्तू घाऊक दराने विकल्या जातात.
मीशो हा एक सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे, जे तुम्ही दोन प्रकारे वापरू शकता. एक, तुम्ही गुंतवणुकीशिवाय ऑनलाइन व्यवसाय सुरू करू शकता आणि दुसरे म्हणजे तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी फॅशन आणि घरगुती वस्तू खरेदी करू शकता. मीशो ऍप मध्ये, कोणतीही वस्तू इतर ई-कॉमर्स स्टोअरपेक्षा स्वस्त मिळते हा लोकांचा अनुभव आहे..
बिझनेस सुरू करण्यासाठी लाखो रुपयांची गरज असते. मीशो ऍप मध्ये झिरो इन्व्हेस्टमेंटसह, तुम्ही ऑनलाइन व्यवसाय सुरू करू शकता तुम्ही ग्राहकांचे चांगले नेटवर्क तयार केले तर तुम्ही दरमहा १ लाख रुपये सहज कमवू शकता. यासाठी त्यांना फक्त फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागेल विशेषतः गृहिणी, विद्यार्थी, शिक्षक, इच्छुक उद्योजक इत्यादींसाठी फायदेशीर आहे, समजा जर एखाद्या महिलेकडे पैसा नसेल आणि तिला व्यवसाय करायचा असेल तर ती सुद्धा गुंतवणूक न करता आपला व्यवसाय सुरू करू शकते,अशा अनेक महिला घरातून हा उद्योग यशस्वीरित्या चालवून कमवत आहेत आणि आत्मनिर्भर बनल्या आहेत .
मीशो हे भारतातील एकमेव ऑनलाइन पुनर्विक्री-रिसेलींग- ऍप आहे . त्याचे मुख्य कार्यालय बंगळुरू येथेच आहे.ऑर्डर बुक केल्यानंतर, मीशो स्वतः डिलिव्हरी आणि रिटर्नचे काम पाहते. त्याचे एकूण निधी ५०कोटी डॉलरपेक्षा जास्त आहे.ते विश्वसनीय आहे ,पूर्णपणे सुरक्षित आहे,यात कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही असा वापरकर्त्यांचा अनुभव आहे.
आजपर्यंत, मीशो ऍप Google Play Store वर ५ कोटीहून अधिक डाउनलोड झाले आहेत, हे ऍप २०१६ मध्ये Y Combinator साठी निवडलेल्या ३भारतीय कंपन्यांपैकी एक होते. जर तुम्हालाही घर बसल्या ऑनलाइन पध्दतीने पैसे कमवायचे असतील तर मीशो ऍप तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.वापरून बघा. जर तुम्ही आधीच वापर करत असाल तर तुमचे अनुभव इथे नक्की सांगा.
लेखिका: स्नेहा शिंदे परब.