आधारकार्ड हरवलं तर काय कराल ? या सोप्प्या स्टेप्स पाहून घ्या !!
पॅनकार्ड नंतर ओळखपत्र म्हणून आधारकार्डला सर्वात जास्त महत्व आहे. म्हणून आधारकार्ड जर हरवलं तर मोठी पंचाईत होऊ शकते. पण घाबरू नका तुम्हाला तुमच्या आधारकार्डची नवी कॉपी घरबसल्या मिळू शकते. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स पाहा भाऊ.
मंडळी, आधारकार्डसाठी https://uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन नवीन आधारकार्ड मिळवू शकता. एवढंच नाही तर तुम्हाला तुमच्या आधारकार्डची डिजिटल कॉपी पण मिळू शकते. यासाठी तुमच्याकडे रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक किंवा इमेल आयडी असणे गरजेचे आहे. या दोन्ही गोष्टी आधारकार्ड बनवताना आधारकार्ड सोबत जोडलेल्या असतात.
पण आधारकार्डला जोडलेला क्रमांक बंद झालेला असेल तर ? मग अशावेळी काय करायचं ? तर त्यासाठी सुद्धा सोप्पी पद्धत आहे. सध्या वापरात असलेल्या क्रमांकावरून तुम्ही आधारकार्डची कॉपी मिळवू शकता. त्यासाठी पुढील स्टेप्स आहेत.
१. https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जा
२. ‘My Aadhaar’ मेन्यूवर क्लिक करून ‘Aadhaar Reprint' वर क्लिक करा.
३. तुमचा आधारकार्ड क्रमांक आणि Security Code लिहा.
४. त्याखाली तुम्हाला “If you do not have a registered mobile number, please check in the box” हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुमचा सध्याचा मोबाईल क्रमांक लिहा.
५. तुमच्या मोबाईलवर एक OTP क्रमांक येईल. तो उजव्या बाजूच्या OTPसाठी असलेल्या रकान्यात भरा.
६. यानंतर आवश्यक तेवढी फीज भरल्यानंतर काही दिवसातच आधारकार्डची नवी कॉपी तुम्हाला पाठवली जाईल.
शेवटी तुम्हाला १४ अंकी SRN ( Service Request Number) क्रमांक दिला जातो. या क्रमांकाने तुम्ही तुमचा आधारकार्ड स्टेटस पाहू शकता.
मंडळी, याच पद्धतीने तुम्ही रजिस्टर्ड क्रमांकाने आधारकार्डची कॉपी मिळवू शकता. यासाठी सर्व माहिती भरल्यानंतर ‘I have TOTP’वर क्लिक करा.
तर मंडळी, आता जर आधारकार्ड हरवला तर टेन्शन नॉट. तुमचा आधारकार्ड तुम्हाला सहज मिळून जाईल.