कोर्टाचा हा निर्णय वृद्ध आईबाबांची काळजी न घेणाऱ्या नाठाळ मुलांना देईल चांगलीच शिक्षा...

एकदा का संपत्ती आपल्या नावावर झाली की आई वडिलांकडे दुर्लक्ष केले जाते. काहीवेळा तर त्यांना वृद्धाश्रमात ठेवले जाते. असं करणाऱ्यास आता कायदा धडा शिकावणार आहे. जर कोणत्याही मुलाने/मुलीने आई वडिलांना छळलं तर नव्या नियमानुसार आई वडिलांना आपली संपत्ती परत घेण्याचा हक्क आहे.

मंडळी, हा महत्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून त्याप्रमाणे ‘पालक आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल, २००७’ च्या कायद्यामध्ये नवीन नियमावलीची भर घालण्यात येणार आहेत. २००७ च्या कायद्या नुसार ज्या ज्येष्ठ नागरिकाने आपली संपती मुलाच्या/मुलीच्या नावावर केली आहे त्यांची देखभालीची पूर्ण जबाबदारी त्यांच्या मुलावर/मुलीवर येते. पण सध्या ही जबाबदारी न घेता त्यांच्याकडे ओझं म्हणून बघितलं जातं.

स्रोत

नवीन नियमाप्रमाणे आई वडिलांचा मानसिक छळ करणाऱ्या मुला-मुलींना घरातून हाकलण्याचा व संपत्तीतून बेदखल करण्याचा हक्कही मिळणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयात संपत्तीच्या संदर्भातील एक खटला दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात निकाल देताना हा निर्णय घेण्यात आला. आता कोणताही नटसम्राट गणपतराव बेलवलकर ‘कोणी घर देता का घर’ असं म्हणताना दिसणार नाही.

मंडळी, उतार वयात आई वडिलांकडे दुर्लक्षित केल्याने काय परिणाम होतात याबद्दलचा आमचा खालील लेख वाचायला विसरू नका :

मुलाकडे बापाचे अंत्यसंस्कार करण्यास वेळच नाही !!

सबस्क्राईब करा

* indicates required