बाबा ते बाबाच, लेकीसाठी घेतला इतक्या कोटींचा हिरा !!
सोथबीस (Sotheby's) ही अमेरिकन कंपनी आजची आघाडीची ब्रोकर कंपनी आहे. कला, दागदागिने, जमीन खरेदी-विक्रीच्या क्षेत्रात या कंपनीने आपला दबदबा तयार केला आहे. कालच या कंपनीने गेल्या ५ वर्षातला सर्वात मोठा हिरा विकला. या हिऱ्याची किंमत तर मोठी होतीच पण त्याही पेक्षा हिरा खरेदी करणाऱ्या व्यक्तीने हिऱ्याला दिलेलं नाव महत्वाचं होतं.
तर, हॉंगकॉंग येथे झालेल्या एका लिलावात ८८.२२ कॅरेटचा हिरा ठेवण्यात आला होता. केवळ १० मिनिट चाललेल्या लिलावात हिऱ्याला तब्बल १३.८ मिलियन डॉलर्स एवढी बोली लागली. भारतीय चलानाप्रमाणे जवळजवळ ९५ कोटी रुपये भाऊ.
सर्वात मोठी बोली लावणारी व्यक्ती जपानची होती. या हिऱ्याला कोणतंही नाव नव्हतं. बोली जिंकल्यानंतर त्या जपानी माणसाने हिऱ्याला आपल्या मुलीचं नाव दिलं आहे. आता हा अब्जावधीचा हिरा "Manami Star" या नावाने ओळखला जाईल.
मंडळी, आफ्रिकेच्या बोट्स्वाना येथील ‘ज्वानेंग’ या खाणीतून हा हिरा शोधण्यात आला होता. या खाणीतूनच जगातील तब्बल ४०% हिरे मिळवले जातात. या कारणाने ज्वानेंग खाणीला जगातील सर्वात श्रीमंत हिऱ्याची खाण म्हणून ओळखलं जातं.
मंडळी, १३.८ मिलियन डॉलर्स जर तुम्हाला मोठे वाटत असतील तर तुम्ही २०१७ च्या लिलावाबद्दल नक्कीच ऐकलं नसणार. २०१७ साली एका लिलावात The Pink Star नावाचा गुलाबी हिरा ठेवण्यात आला होता. तो हिरा तब्बल ७१.२ मिलियन डॉलर्सला विकला गेला. ‘रुपया’प्रमाणे जवळजवळ ५ अब्ज रुपये राव.