जिओ धमाका : जिओ देणार तब्बल ११०० जीबी डाटा 'फ्री' !!.....वाचा कसे घ्यायचे कनेक्शन...
गेल्या २ वर्षात जिओने मोठीच क्रांती केली आहे. एकापेक्षा एक सरस ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याची एकही संधी जिओने सोडलेली नाही. आता नवीन धमाका घेऊन पुन्हा एकदा जिओ आपल्या भेटीला येत आहे. यावेळी ग्राहकांसाठी जिओने ‘फायबर टू द होम’ (FTTH) ब्रॉडबॅंड सर्व्हीस आणली आहे. या सर्व्हिसमुळे ग्राहकांना तब्बल ११०० जीबी (१.१ टीबी) डाटा वापरता येणार आहे भाऊ !!
चला याबद्दल आणखी जाणून घेऊया
२०१६ पासून ‘फायबर टू द होम’ सर्व्हिसची चाचणी जिओद्वारे केली जात होती. यशस्वीपणे चाचणी केल्यानंतर यावर्षी ‘जिओ-फायबर’ अखेर बाजारात येणार आहे. यामध्ये ग्राहकांना १०० जीबी हायस्पीड डाटा दिला जाईल. हे १०० जीबी संपल्यानंतर तुम्हाला महिन्याचे २५ दिवस तब्बल ४० जीबी फ्री डाटा वापरता येईल. म्हणजेच एकूण ११०० जीबी डाटा ग्राहकांना मिळेल. हा डाटा १०० Mbps स्पीडचा असल्याने ग्राहकांची तर बल्लेबल्ले होणार आहे राव.
आणखी एक धमाका म्हणजे जिओ-फायबर सर्व्हीसच्या माध्यमातून तुम्हाला टीव्ही सुद्धा पाहता येईल. एकदा का तुम्ही जिओ-फायबरची निवड केलीत की तुम्हाला जिओकडून राऊटर लावून दिला जाईल ज्याचा दुसरा उपयोग सेट टॉप बॉक्स म्हणून देखील केला जाऊ शकतो. एकूण काय तर इंटरनेट आणि टीव्ही असा टू इन वन प्रकार जिओ ऑफर करत आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या सर्व्हिसचे पैसे किती भौ ? त्याचं असं आहे, तुम्हाला ४५०० सिक्युरिटी चार्जेस म्हणून द्यावे लागतील. एकदा का हे चार्जेस भरले की तुम्हाला जिओ राऊटर लावून देईल.
मंडळी जिओ-फायबरची सेवा मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, वडोदरा इत्यादी शहरांमध्ये सुरु होणार आहे. याबद्दल आणखी माहिती थोड्याच दिवसात समोर येईल. जिओचे देशभरातील ३ लाखापेक्षा जास्त ऑप्टीक फायबर नेटवर्क बघता भविष्यात राऊटर आणि सेट बॉक्सच्या जागी जिओ-फायबर दिसल्यास नवल वाटणार नाही.
आणखी वाचा :
जीओ पाणीपुरीची दन दना दन ऑफर !!!