computer

इटलीच्या या सुंदर गावात ३ महिने मोफत रहा...पूर्ण कराव्या लागतील या ३ अटी !!!

रोजच्या कामातून आपल्याला एक ब्रेक हवाच असतो. वर्षभर काम केल्यानंतर काही महिने तरी कुटुंबासाठीकिंवा स्वतःसाठी दिलेच पाहिजे. हा सुट्टीचा काळ आपल्याला पुन्हा एकदा कामावर रुजू होण्यासाठी ताजंतवानं करत असतो. जर तुम्ही सुद्धा अशाच सुट्टीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इटलीच्या Grottole गावात तुम्हाला ३ महिने मोफत राहता येईल. हे गाव कसं आहे याची एक झलक बघून घ्या.

मंडळी, ही ट्रीप फ्री असली तरी सगळ्यांनाच संधी मिळणार नाहीय. निवडक अशा ४ जणांनाच ही संधी देण्यात येईल. त्यासाठी काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत त्या आधी बघून घ्या !!

तुम्हाला स्थानिक NGO Wonder Grottole सोबत काम करावं लागेल, स्थानिक भाषा शिकावी लागेल, इटालियन पदार्थ शिकून घावे लागतील आणि स्थानिक शेतीला मदत करावी लागेल. तुमच्या खर्चासाठी तुम्हाला प्रत्येक महिना ७२,००० रुपये दिले जातील.

अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :

italiansabbatical.com

या फ्री ट्रीप मागचं कारण काय आहे ?

मंडळी, या सर्व प्रवासाची योजना Airbnb या कंपनीची आहे. इटली Grottole सारख्या अनेक नयनरम्य गावांनी भरलेला आहे, पण सध्या ही गावं निर्मनुष्य होत चालली आहेत. आज Grottole गावात ६०० रिकामी घरं आहेत. पूर्ण गावाची लोकसंख्या केवळ ३०० उरली आहे. गावाचं जतन करण्यासाठी स्थानिक Airbnb तर्फे ही वेगळी योजना आखण्यात आली आहे.

मंडळी, इटलीच्या लोकांनी आपलं गाव वाचवण्यासाठी जी योजना आखली आहे त्याच प्रकारची योजना आपल्याला महाराष्ट्रातील किल्ले वाचवण्यासाठी आखता येईल. तुम्हाला काय वाटतं ? तुमच्याकडे अशा कल्पना असतील तर आम्हाला नक्की सांगा !!

 

आणखी वाचा :

स्वित्झर्लंडच्या या गावात राहण्यासाठी मिळतायत तब्बल २५००० डॉलर्स !!

सबस्क्राईब करा

* indicates required