२० वर्षापूर्वी कार पार्किंग मध्ये लावून तो विसरला आणि...वाचा पुढे काय झाले !!
मंडळी, विसरभोळेपणाचं एक उत्तम उदाहरण नुकतंच उघडकीस आलं आहे. झालं असं की, फ्रँकफुर्ट मध्ये १९९७ साली एका माणसाने त्याची कार चोरीला गेल्याची पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी यावर अनेक वर्ष तपास घेतला पण कार सापडली नाही.
२०१७ साली एका कारखान्याने पोलिसांना कळवले की त्यांना त्यांची इमारत पाडायची असल्याने पार्किंग मध्ये असलेल्या बेवारशी कारचा त्यांनी ताबा घ्यावा. या कारखान्याने ज्या कारची माहिती दिली होती त्यावरून २० वर्षापूर्वी चोरीला गेलेल्या कारचा पत्ता लागला.
पोलिसांनी कारच्या मालकाचा शोध घेतल्या नंतर या माणसा पर्यंत ते जाऊन पोहोचले. पोलिसांनी माहिती दिल्यानंतर त्याला आठवलं की आपण २० वर्षापूर्वी कारखान्याच्या पार्किंग मध्ये कार लावून विसरून गेलो होतो. आता कार मिळाली असली तरी फायदा काय, कारण आता २० वर्षानंतर ही कार फक्त भंगारातच जाऊ शकते.