नितीन तेंडूलकर यांची कविता- पावसाळा...
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/field/image/Rain%20Nitin%20Tendulkar.jpg?itok=_l6quo6N)
तर मंडळी, आज काय? घरीच ना? की पाऊस थांबला म्हणून लगेच ऑफिसला पळालात? कालची रात्र कुठे काढली? ऑफिसमध्ये, की मित्राच्या घरी??
जाऊ दया! आज सुध्दा पाऊस जोरात असणार आहे असं हवामान खात्यानं म्हटल्यानं त्यानंही थोडी विश्रांती घेतलीय. पण आता वेळ मिळालाच आहे तर जरा निवांत बसा. गप्पा मारा. मुंबईकरांना सुट्टी आवडतच नाही म्हणे! मग पाऊस अशी सुट्टी घ्यायला लावतो.
![](/sites/default/files/Sachin%20Nitin%20Tendulkar.jpg)
तुमच्यासाठी आम्ही आज घेऊन आलो आहोत नितीन तेंडूलकर यांची कविता- " पावसाळा ". नितीन तेंडूलकर म्हणजे आपल्या सचिनचा भाऊ!
ही कविता मैजेस्टिक प्रकाशननं प्रकाशित केलेल्या "पावसाळा" या कविता संग्रहात आहे. या संग्रहाचं मुखपृष्ठ म्हणजे ही कविता आहे. हे मुखपृष्ठ कोणाचं आहे हे आम्हांला माहिती नाही पण कविता चित्रातून मांडण्याचा हा आविष्कार अफ़लातून आहे!