व्हिडीओ ऑफ दि डे : आपल्या लाडक्या सचिनच्या पहिल्या सामन्याची दुर्मिळ व्हिडीओ क्लिप पाहून घ्या !!
१५ नोव्हेंबर १९८९ - आजच्याच दिवशी मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पहिलं पाऊल ठेवलं होतं. त्यावेळी त्याचं वय होतं अवघं १६ वर्ष आणि २०५ दिवस. मुश्ताक अहमद आणि अकिब जावेद नंतर सचिन हा तिसरा सर्वात लहान वयाचा क्रिकेटर ठरला होता.
१९८९ साली क्रिकेट जगतात पाऊल ठेवल्यानंतर या पठ्ठ्याने पुढच्याच वर्षी १९९० साली कसोटी सामन्यातील आपलं पहिलं शतक पूर्ण केलं. हा रेकॉर्ड करणारा तो तिसरा खेळाडू होता.
मंडळी, आजच्या या खास दिवशी आम्ही सचिन तेंडूलकरची कारकीर्द सांगणार नाही आहोत. आज आम्ही तुम्हाला त्याच्या पहिल्यावहिल्या धावांचा व्हिडीओ दाखवणार आहोत. सचिनने आपल्या पहिल्याच सामन्यात केवळ १५ धावा केल्या होत्या. यावेळी बॉलर होता पाकिस्तानचा वकार युनुस. दोघेही आपला पहिला सामना खेळत होते. काय घडलं त्या दिवशी हे तुम्हीच पाहा.