चायनीज माणसाने विमानाच्या इंजिन मध्ये फेकले चिल्लर, घडली जन्माची अद्दल !!

मंडळी, विमान प्रवासाचा फोबिया असलेल्या व्यक्तींना अंधश्रद्धेने ग्रासलेलं असतं. ‘आता पक्क्का प्लेन कोसळणार’ यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. मग हनुमान चालीसा काय, देवाच्या नावाने धावा काय आणि हल्लीची नवीन फॅशन म्हणजे हाताची बोटे क्रॉस करणे. असे बरेच प्रकार सुरु होतात.

पण या चायनीज माणसाने जे केलं ते जगावेगळं होतं. त्याने विमानात बसण्याच्या भीतीपोटी चक्क विमानाच्या इंजिन मध्ये चिल्लर फेकले आहेत.

नक्की प्रकरण काय ?

त्याचं झालं असं, की विमानतळावरील स्टाफला विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिन जवळ एक युआन (चीनी नाणे) सापडलं. २८ वर्षांच्या ‘लु’ नावाच्या व्यक्तीने हे माझंच काम आहे हे कबूलही केलं. तो म्हणाला की मी ‘गुड लक’साठी नाणी फेकली होती. त्याच्या प्रमाणे असं केल्याने विमानाचं संरक्षण झालं असतं.

त्याचं हे म्हणनं बरोबर आहे की चूक हे समजण्यापूर्वीच आक्रीत घडलं.

‘लकी एअर’ ही विमान कंपनी चांगलीच नाराज झाली आहे. ‘लु’च्या या कृत्याने कंपनीला १.४ लाखाचं नुकसान झाल्याचं कंपनीने सांगितलंय. याची नुकसानभरपाई लु कडून करण्यात येणार आहे. एवढंच नाही तर लवकरच लकी एअर कंपनी त्याला कोर्टात खेचणार आहे भाऊ.

स्रोत

कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे इंजिन मध्ये एखादं नाणं गेलं असेल तर इंजिनचं मोठं नुकसान होण्याची शक्यात आहे. याच करणाने लगेचच फ्लाईट कॅन्सल करण्यात आली.

चीनी लोकांमध्ये ‘गुड लक’साठी नाणी फेकण्याची जुनी प्रथा आहे. या प्रथेला जास्त गंभीरपणे घेऊन काही लोकांनी स्वतःवर संकट ओढवून घेतलंय. विमानाच्या इंजिन मध्ये नाणी फेकण्याची ही पहिली वेळ नाही. या पूर्वी काही वृद्ध व्यक्तींना हा प्रकार केला होता. यावेळी मात्र एक तरुण सापडला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required