व्हायरल व्हिडीओ: हे लोक चक्क रियल लाईफमध्ये ल्युडो खेळून राहिले ना भौ!!!!
लहानपणी उन्हाळ्यात ल्युडो आणि सापशिडी खेळण्यात अखंड तास घालावले असतीलच. त्यानंतर आजकाल ल्युडोस्टार आणि ल्युडो किंग या दोन ऍप्सनी लोकांना वेड लावलंय. या गेमने वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या लोकांना एकत्र ल्युडो खेळायची संधी तर दिलीये. पण मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसल्यामुळे आईच्या शिव्या पण खाव्या लागतात राव!!!
पण आज ल्युडो खेळायला कोणीच भेटलं नाही. म्हणून आम्ही फेसबुकवर बागडायला गेलो. तेव्हा नेहमीप्रमाणे आम्हाला एक भारी व्हिडीओ सापडला आहे. तर मंडळी, या व्हिडीओमध्ये काही अतरंगी लोक वाळवंटात लुडोचं रिंगण आखून चक्क स्वत:च सोंगट्या बनून खेळताना दिसत आहेत. त्यातला एक पंटर आपल्या सोंगटीला काही घरं पुढे चालवतो आणि दुसऱ्या प्लेयरच्या सोंगटीला मारून टाकतो. बघाच आता या छोट्याश्या व्हिडिओची गंमत.
तर व्हिडीओ बघून झाला असेल आणि तुम्हाला जर खुमखुमी आली असेल तर उघडा ऍप आणि होऊन जाउद्या एक गेम...