हिमालयात प्लास्टिक बाटल्यांवर बंदी

काय?

उत्तराखंड मधील हिम जागृती मंच या सेवाभावी संस्थेने नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कडे पेट बाटल्यांवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

का?

पाणी , सरबते , शितपेय आणि औषधे  या साठी वापरल्या जाणार्‍या पेट बॉटल्स मधून अँटीमनी कॅड्मीयम , शिसे , क्रोमीयम सारख्या विषारी  धातूंचे संक्रमण होते असे लक्षात आले आहे. या खेरीज  डाय-एथायल-थॅलेट या घातक रसायनाचे अभिसरण प्रमाणाबाहेर होत असल्याने धोक्याची पातळी आणखीच उंचावत जात आहे. हे रसायन कर्करोगाचे कारणीभूत रसायन आहे.  अँटीमनीमुळे  रक्तदाब वाढतो आणि हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते. शिसे मूत्रपिंड निकामी करते आणि कॅड्मीयम श्वसन संस्थेवर विपरित परिणाम करते . हिम जागृती संस्थेने  हे सर्व दावे वेगवेगळ्या सरकारी प्रयोगशाळांमधून तपासून घेतले आहेत.

गेली कित्येक वर्षे हिम जागृती ही संस्था पेट बाटल्यांवर बंदी यावी म्हणून प्रयत्नशील आहे. पण ब्यूरो ऑफ  इंडीयन स्टँडर्डकडे  या प्रमाणीकरण करणार्‍या  नियमप्रणाली उपलब्ध नसल्याने पेट बाटल्यांचा वापरावर बंदी आणणे  शक्य होत नाही. यापूर्वी इंडियन काउन्सील ऑफ मेडीकल रीसर्चने लहान मुले आणि गर्भवती स्त्रियांसाठींच्या औषधासाठी पेट बाटली वापरण्यावर बंदी आणाण्याची सूचना केली होती पण त्यावर अजूनही काही निर्णय झालेला नाही. नियमांचा अभाव आणि पेट लॉबीचा दबाव ह्या कारणांंमुळे पेट बंदी अमलात आलेली नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required