जगातील १० अतरंगी खेळ...पहा तर चौथ्या क्रमांकावर कोणता खेळ आहे !!
क्रिकेट, फुटबॉल, हॉकी तर सगळेच खेळतात पण आज आम्ही तुम्हाला अशा खेळांची ओळख करून देणार आहोत ज्यांच्याबद्दल तुम्ही कधीच ऐकलं नसेल. चला तुम्हाला उदाहरणच देतो, चेस बॉक्सिंग, पायाच्या अंगठ्याची कुस्ती, बायकोला घेऊन पळणे, उंटांची कुस्ती, इत्यादी. हे तर काहीच नाही, खूप मोठी लिस्ट आहे राव.
चला तर पाहूयात जगातील १० अतरंगी खेळ कोणते आहेत.
१. उंटांची कुस्ती
मंडळी, बैलांची शर्यत किंवा कोंबड्यांची झुंज तर ऐकलं होतं पण उंटांची कुस्ती हा प्रकार नवीन आहे. खरं तर हा खेळ आपल्यासाठी नवीन आहे पण तुर्कस्तानात तो २४०० वर्षांपासून खेळला जातोय. तुर्कस्तानात उंटांच्या कुस्तीचा मोठा जंगी कार्यक्रम भरवला जातो राव.
२. चीज रोलिंग
हा खेळ इंग्लंड मध्ये प्रसिद्ध आहे. या खेळात एका उंच टेकाडावरून ‘चीज’ चा गोळा खाली फेकला जातो आणि त्या गोळ्याला पकडण्यासाठी माणसांची रेस सुरु होते. टेकाडावरून खाली धावत माणसं चीज पर्यंत पोहोचतात. हे सोप्प नसतं राव. टेकडीवरून सरळ खाली उतरताना अनेकांना जखमी व्हावं लागतं.
३. बायकोला उचलून पळणे
मंडळी, तुम्ही “दम लगा के हईश्शां” पाहिला आहे का ? त्या चित्रपटात जी रेस दाखवली आहे अगदी त्याचीच ही डिट्टो कॉपी आहे. फिनलंड मध्ये हा अधिकृत खेळ असून अनेकजण भाग घेतात. जिंकणाऱ्या नवऱ्याला त्याच्या बायकोच्या वजना इतकी बियर, तिच्या वजनाच्या ५ पट रक्कम आणि फायनल मध्ये जाण्याची संधी मिळते.
४. एक्स्ट्रीम आयर्निंग
मंडळी, या खेळात कपड्यांना इस्त्री करायची असते. पण....इस्त्री करण्याची पद्धत भलतीच आहे राव. पाण्याच्या खाली, डोंगरावर लटकून, पॅराशूट मधून, बर्फावरून स्केटिंग करताना, सायकल रेस मध्ये. मंडळी ज्याचा आपण विचारही करू शकत नाही अशा ठिकाणी इस्त्री करायची असते. नियम म्हणजे दोन्ही कामावर लक्ष असलं पाहिजे. शेवटी कडक इस्त्री करणाराच जिंकतो. ट्राय करून बघणार का ?
५. अंडी फेकण्याचा खेळ.
राव हा सोप्पा खेळ आहे. अंडी फेकायची आणि अंडी झेलायची. दुसऱ्याने फेकलेली अंडी झेलली नाहीत तर ती कपड्यांना झेलावी लागतात.
६. अंडरवॉटर हॉकी
आईस हॉकी नंतर आता अंडरवॉटर हॉकी सुद्धा जोर धरू लागली आहे. हा खेळ एका स्विमिंग पूल मध्ये खेळता येतो. अंडरवॉटर हॉकीला सर्वसाधारण हॉकीचेच नियम लागू होतात.
७. पायाच्या अंगठ्याची कुस्ती
मंडळी ही कुस्ती १९७६ पासून प्रसिद्ध आहे. नियम अगदी सोप्पे आहेत, पायाच्या अंगठ्याच्या सहाय्याने समोरच्याला चितपट करायचं. आता तुम्ही जर विचार करत असाल की ‘हा कसला खेळ आहे ?’ तर तुम्हाला एक महत्वाची माहिती देतो. हा खेळ ४ दारुड्यांनी मिळून शोधला आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हा खेळ कसा जन्माला असावा.
८. चेस बॉक्सिंग
मंडळी, या खेळासाठी माणूस डोकेबाज आणि मुक्काबाज दोन्ही असावा लागतो. चेस बॉक्सिंग मध्ये ११ राउंड असतात. या ११ राउंड मध्ये बॉक्सिंग बरोबरच चेस खेळला जातो. शेवटी जो दोन्ही मध्ये जिंकतो तोच विजेता.
९. मॅन व्हर्सेस हॉर्स
मंडळी, धावण्यात घोड्याबरोबर माणसाने शर्यत लावणे म्हणजे सामना बरोबरीचा नाही वाटत. म्हणूनच तर हा खेळ विचित्र आहे राव. काय असतं ना, ३५ किलोमीटर घोड्याबरोबर रेस लावायची. यात घोड्यावर एक माणूस बसलेला असतो. घोड्यावरचा माणूस घोड्याला दिशा देण्याचं काम करतो.
हा खेळ ‘वेल्स’ देशात १९८० साली जन्मला. एका पब मध्ये दोघेजण माणूस आणि घोड्याच्या शर्यतीत घोडा जिंकेल की माणूस यावरून भांडत होते. पबच्या मालकाने यावर एक नामी शक्कल लढवली. त्याने सरळ सरळ घोडा आणि माणसाची रेस सुरु केली राव. तेव्हा पासून हा खेळ वेल्स मध्ये प्रचलित आहे. आता पब सारख्या ठिकाणी असल्याच विचित्र खेळाचा शोध लागणार ना भाऊ.
१०. स्पेआक टाक्रो
स्पेआक टाक्रो फुटबॉल आणि व्हॉलीबॉलचं मिश्रण आहे. या खेळाची व्यवस्था व्हॉलीबॉल सारखीच असते. याचे नियम मात्र जगावेगळे आहेत राव. या खेळात बॉल पास करण्यासाठी हातांचा वापर करायचा नसतो. हातांच्या ऐवजी तुमच्या शरीराचा कोणताही भाग वापरण्याची परवानगी असते. मलेशियात स्पेआक टाक्रो प्रचंड लोकप्रिय आहे.
तर मंडळी, यातला कोणता खेळ तुम्हाला जास्त अतरंगी वाटला ? कमेंट बॉक्स मध्ये सांगा राव !!
आणखी वाचा :
जगभरातले २० अतरंगी टॉयलेट्स - ७ नंबर वर जे आहे ते आपल्या सर्वांसाठी आहे राव !!
शनिवार स्पेशल : इतिहासातील १० विचित्र नोकऱ्या !!