आज वाढदिवसाच्या दिवशी पाहूयात कुंबळेच्या महान कामगिऱ्या दाखवणारे हे व्हिडीओ
अनिल कुंबळे अनेक वर्ष भारताच्या बॉलिंगच्या पाठीचा कणाच होता. आपल्या टीममधल्या मध्यमगती गोलंदाजांपेक्षा जास्त फास्ट बॉल टाकणारा कुंबळे हा लेग स्पिनर होता. आपल्या संपूर्ण करियरमध्ये त्याने अनेक चढउतार पाहिले. भारताच्या अनेक विजयांमध्ये त्याचं महत्वाचं योगदान होतं. जंबो या टोपणनावानं ओळखल्या जाणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस आहे.
त्याच्या वाढदिवसानिमित्त पाहूयात त्याच्या करियर मधले काही खास व्हिडीओ..
१. जबडा तुटला असताना केलेली बॉलिंग
वेस्टइंडिज विरुद्ध कुंबळे जबडा तुटला असतानासुद्धा बँडेज बांधून बॉलिंग टाकायला आला होता. कुंबळेच्या कमिटमेंटच्या बाबतीत कधीच कोणी शंका घेऊ शकत नाही.
२. पाकिस्तान विरुद्ध घेतलेल्या १० विकेट्स
याबद्दल काही बोलायची गरजच नाही. आजवर फक्त २ लोकांना हे करणं शक्य झालंय. कोटला मदानावर केलेला पराक्रम परत करणं सोपं नाहीय. काय म्हणता?
३. टायटन कप श्रीनाथ सोबतची बॅटिंग
टायटन कपमध्ये भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्ध बंगलोरला वन डे मॅच होती. नेहमीप्रमाणे भारताच्या बॅट्समनने लवकर विकेट फेकल्या होत्या. श्रीनाथ आणि कुंबळेच्या पार्टनरशिपनं भारताला जिंकून दिलं होतं.
४. करियर बेस्ट १२/६
वेस्टइंडिजच्या संघांविरुद्ध ह्या त्याच्या बेस्ट फिगर्स होत्या. ईडन गार्डन सारख्या मैदानावर त्या काळी सामना बघायला लाख लोकं असायची. त्यांच्या पाठींब्यासोबत बॉलिंग करताना एका स्पेलमध्ये त्याने वेस्टइंडिजच्या सहा विकेट्स घेतल्या होत्या.
५. ओव्हलवर केलेली सेंच्युरी
कुंबळे बॉलिंग एवढाच चिवट बॅट्समन होता. त्यानं इंग्लंडविरुद्ध ३६ व्या वर्षी केलेली सेंच्युरी ही नक्कीच लक्षात ठेवण्यासारखी इनिंग आहे.
(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)
©बोभाटा