computer

IPL च्या विजेत्या आणि उपविजेत्यांना मिळणार इतका रग्गड पैसा.....रक्कम बघून घ्या राव !!

१ बॉलवर २ रन हवे आहेत. बॉलर आहे मलिंगा. बॅटींग करत आहे शार्दुल ठाकुर. सगळ्यांचं लक्ष शेवटच्या बॉलकडे. मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी मंत्रजप करत आहेत. आणि शेवटचा बॉल पडला. शार्दुल ठाकुर आउट. IPL मुंबई इंडियन्सने खिशात घातली.

मंडळी, IPLचा अंतिम सामना काल रंगला. चेन्नई सुपरकिंग्सवर मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. इतर कोणताही सामना असतो तसाच IPL चा सामना हा तिथे मिळणाऱ्या पैशांसाठी ओळखला जातो. वेजेत्या आणि उपविजेत्या टीमला रग्गड पैसा मिळतो राव. सोबतच सामन्यात कमाल दाखवणाऱ्या खेळाडूंना पण वेगळं मानधन मिळतं. यावर्षीचा सिझन संपलेला आहे. त्यानिमित्ताने आपण कोणाकोणाला किती पैसे मिळणार याची यादी बघून घेऊया.

विजेती टीम : २० कोटी. (MI)

उपविजेती टीम : १२.५० कोटी. (CSK)

मॅन ऑफ दि फायनल : ५ लाख. (जसप्रीत बुमराह)

मोस्ट वॅल्युयेबल प्लेअर (MVP) : १० लाख. (आंद्रे रसेल)

ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) : १० लाख. (डेव्हिड वॉरर्नर)

पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) : १० लाख. (इम्रान ताहीर)

एमर्जिंग प्लेअर : १० लाख. (शुबमन गिल)

सुपर स्ट्राईकर : १० लाख आणि कार. (आंद्रे रसेल)

कॅच ऑफ दि सिझन : १० लाख. (केरन पोलार्ड)

स्टाईलीश प्लेअर ऑफ दि सिझन : १० लाख. (के. एल राहुल)

सर्वात जलद ५० धावा : १० लाख. (हार्दिक पांड्या)

पीच अँड ग्राउंड अवॉर्डस् : २५ लाख. (पंजाब आणि हायद्राबाद संघ)

बघा राव, आपण आपल्या आवडत्या टीम बद्दल भांडत बसतो पण त्यांना इतके पैसे मिळतात.

सबस्क्राईब करा

* indicates required