ICC ची सर्वोकृष्ट बॅट्समन्सची यादी....जास्तीतजास्त दिवस पहिल्या स्थानी राहणारे खेळाडू कोण आहेत?
आयसीसी (International Cricket Council) कसोटी, वनडे आणि टी ट्वेन्टीसाठी सर्वात चांगला बॅट्समन, सर्वात चांगला बॉलर, सर्वात चांगला संघ अशी क्रमवारी करत असते. या वनडे क्रमवारीत भारताचा विराट कोहली गेली 3 पेक्षा जास्त वर्षे सर्वोकृष्ट बॅट्समन म्हणून पहिल्या स्थानावर होता. तर दुसऱ्या क्रमांकावर भारताचाच रोहित शर्मा होता. पण कोहली आणि रोहितला देखील मागे टाकत पाकिस्तानचा एक खेळाडू पहिल्या स्थानी आला आहे.
बाबर आझम हा पाकिस्तानी कॅप्टन गेल्या काही दिवसांपासून आपल्या बॅटिंगमुळे चर्चेत आला होता, यावेळी त्याने वनडेमध्ये सर्वोकृष्ट स्थान पटकावले आहे. यात कोहली एवढी वर्षे पहिल्या स्थानी राहिला हा देखील एक विक्रम आहे. जास्तीतजास्त दिवस या क्रमवारीत पहिल्या स्थानी राहण्याच्या तो तिसऱ्या स्थानी आहे. जर तो अजून एक दिवस पहिल्या स्थानावर राहिला असता तर तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला असता.
वेस्ट इंडिजचे महान खेळाडू व्हिव रिचर्ड हे सातत्यपूर्ण पहिल्या स्थानी राहणाऱ्या खेळाडूंमध्ये देखील पहिले आहेत. त्यांनी तब्बल १७४८ दिवस या स्थानावर राहून दाखवले आहे. म्हणजेच साडे चार वर्षांपेक्षा जास्त काळ ते या स्थानी होते.
दुसऱ्या क्रमांकावर आहेत ऑस्ट्रेलियाचे मायकल बेवेन. बेवेन यांनी १२५९ दिवस या स्थानी असण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेला कोहली हा १२५८ दिवस या स्थानावर होता. फक्त एका दिवसाने त्याचा या यादीत दुसऱ्या स्थानी येण्याचा चान्स हुकला असे म्हणावे लागेल.
कोहली नंतर ४ थ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच्याच डिन जॉन्स यांचा नंबर येतो. ते ११४६ दिवस या स्थानावर होते.
तर ५ वा क्रमांक हा वेस्ट इंडिजचा लोकप्रिय खेळाडू ब्रायन लारा याचा आहे. ब्रायन लारा हा १०४९ दिवस पहिल्या क्रमांकावर होता.
क्रिकेटबद्दल अशी आणखी कोणती माहिती तुम्हांला वाचायला आवडेल हे आम्हांला जरूर कळवा..