computer

जाणून घ्या आपल्या क्रिकेटर्सची टोपणनावं काय आहेत आणि ती कशी पडली !!

प्रत्येक माणसाला एक टोपणनाव असतं. आपल्याकडे सोनू, मोनू, छोट्या, बंटी अश्या नावांची अख्खी रांग आहे. याला सामान्य माणूस काय फिल्म्सस्टार्स आणि क्रिकेटर सुद्धा अपवाद नाहीत. मंडळी, मागे एकदा आम्ही “बॉलीवूड सेलिब्रिटींची गमतीदार टोपणनावं !!” या लेखातून बॉलीवूड सेलिब्रिटींची टोपणनाव काय आहेत त्याबद्दल सांगितलं होतं. आज आम्ही घेऊन आलो आहोत टीम इंडियाच्या क्रिकेटर्सची टोपणनावं.

चला तर बघून घ्या :

 

विराट कोहली - चिकू

विराटला हे नाव त्याच्या कोच कडून मिळालं आहे. केस कापल्याने तो एकदा चंपक मासिकातील 'चिकू' सश्यासारखा दिसत होता. त्यावेळी त्याला कोचने पहिल्यांदा चिकू म्हणू हाक मारली.

अजिंक्य रहाणे - अज्जू आणि जिनक्स

अजिंक्य रहाणे या मराठमोळ्या क्रिकेट प्लेयरला त्याचं जिनक्स हे नाव शेन वॉर्न ने दिलं आहे. शेन वॉर्नला अजिंक्य नाव उच्चारता येत नसल्याने त्याने अजिंक्य ऐवजी 'जिनक्स' बोलायला सुरुवात केली. आणि अज्जू नावाबद्दल सांगायचं झालं तर हे नाव त्याच्या अजिंक्य नावावरूनच त्याला मिळालं आहे.

शिखर धवन - गब्बर आणि जट

रणजी सामन्याच्या दरम्यान जर प्रतिस्पर्धी टिम फलंदाजीत चांगले खेळत असतील तर शिखर धवन त्यांना बघून 'बहोत याराना लागता है रे !' हा गब्बर चा डायलॉग मारायचा. इथूनच त्याला त्याचं गब्बर हे नाव मिळालं. त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला बघून त्याला 'जट' या नावाने देखील हाक मारली जाते.

सुरेश रैना - सोनू

खरं तर सुरेश रेनाला माहितीच नाही की हे नाव त्याला कसं आणि कधी मिळालं.

बरं पण, हाच का तो सोनू ?

रोहित शर्मा - शाणा, हिटमॅन आणि रो

रोहित शर्माला 'शाणा' हे नाव युवराज सिंगने दिलं. त्याला त्याच्या सुस्साट फलंदाजीमुळे त्याचे चाहते 'हिटमॅन' म्हणून ओळखतात, आणि 'रो' हे नाव त्याला त्याच्या पत्नीकडून मिळालं आहे.

हार्दिक पंड्या - रॉकस्टार आणि हेअरी

हार्दिकच्या हेअरस्टाईलमुळे त्याला 'हेअरी' नाव मिळालं. तो जेव्हा मुंबई इंडियन्ससाठी खेळत होता तेव्हा त्याला त्याचे साथीदार 'रॉकस्टार' म्हणायचे.

युवराज सिंग - युवी

युवराज या नावाची फोड म्हणजे 'युवी'

रविचंद्रन अश्विन - अॅश

अश्विन हे खरं तर 'आर. अश्विन'चं आडनाव आहे. त्याच्या आडनावाचा शॉर्टकट म्हणजेच 'अॅश'. 

क्रिकेट मधली ऐश्वर्या म्हणायची का याला ?

रवींद्र जडेजा - जड्डू

आडनावावरून टोपणनाव पडलेल्यांच्या यादीत रवींद्र जडेजा देखील सामील आहे.

भुवनेश्वर कुमार - भुवि

भुवनेश्वर कुमार हे एवढं मोठं नाव कोण उच्चारणार म्हणून 'भुवि'.

मुरली विजय - दि माँक

मुरली विजयने एकदा पूर्ण टक्कल केलं होतं. तिथूनच त्याला त्याचं दि माँक म्हणजेच 'साधू' हे नाव मिळालं.

महेंद्रसिंग धोनी - माही

आधी महेंद्र चं 'माहे' झालं आणि प्रसिद्धी झोतात आल्यानंतर माहे चं 'माही' असं सुटसुटीत नाव तयार झालं. अश्या प्रकारे महेंद्र सिंग धोनी हा 'माही' झाला.

 

आणखी वाचा :

वाचा बॉलीवूड सेलिब्रिटींची गमतीदार टोपणनावं !!!

सबस्क्राईब करा

* indicates required