...म्हणून वर्ल्डकप सामने दर चार वर्षांनीच होतात !!

मंडळी सध्या फुटबॉल वर्ल्डकपचे वारे वाहत आहेत. पुढच्यावर्षी क्रिकेट वर्ल्डकपचे वारे वाहतील. पण काय राव, तुम्ही कधी विचार केला आहे का. ऑलम्पिक पासून ते क्रिकेट, हॉकी, फुटबॉलचे विश्वचषक सामने चार वर्षांनीच का भरवले जातात. ३, ५ किंवा १० वर्षांनी का नाही ? कधी विचार केला आहे का ?

राव, याचं उत्तर आज आम्ही घेऊन आलो आहोत. चला तर जाणून घेऊया...

मंडळी, त्याचं काय आहे ना अशा गहन गोष्टींचा डायरेक्ट संबंध हा इतिहासाशी असतो. तसंच या ४ वर्षाच्या लॉजिकचं सुद्धा आहे.

स्रोत

तर, याची सुरुवात झाली ग्रीस पासून. ग्रीसच्या विविध भागात तब्बल ३००० वर्षांपूर्वी (इसविसनपूर्व ७७६) ‘पॅनहेलेनिक गेम्स’ भरावले जायचे. ‘पॅनहेलेनिक गेम्स’ म्हणजे एकप्रकारे ४ विविध क्रीडा महोत्सव होते. या ४ पैकी एक खेळ महोत्सव म्हणजे ‘ऑलम्पिक’.

अथेन्सच्या ओलंपिया  पर्वताजवळ भरवण्यात येणारा खेळ महोत्सव म्हणून त्याचं नाव ‘ऑलम्पिक’ ठेवण्यात आलं. ‘पॅनहेलेनिक गेम्स’ची सुरुवातच मुळात ‘ऑलम्पिक’ पासून व्हायची. इतर ३ खेळ महोत्सव होऊन पुन्हा ऑलम्पिकची वेळ यायला ४ वर्ष लागत. या ४ वर्षांच्या कालावधीला ‘ऑलेम्पियड’ म्हणायचे.

स्रोत

मंडळी, ‘पॅनहेलेनिक गेम्स’ मधले इतर महोत्सव तितके गाजले नाहीत पण ‘ऑलम्पिक’ मात्र ऐतिहासिक ठरला. ‘ऑलम्पिक’ सामन्यांच्या वेळी सर्व युद्धांवर बंदी लावली जायची. सर्वजण एकत्र येऊन खेळांच्या रूपाने आपापली शक्ती दाखवत.

काळाच्या ओघात प्राचीन ‘ऑलम्पिक खेळ’ बंद पडला. त्याची पुन्हा सुरुवात व्हायला १८९६ साल उजाडावं लागलं. आधुनिक ऑलम्पिक खेळांचं आयोजन करताना त्याच प्राचीन पद्धतीचा अवलंब केला गेला. दर ४ वर्षांनी ऑलम्पिक खेळ आयोजित केले जाऊ लागले. 

१८९६ चं पहिलं ऑलम्पिक, अथेन्स स्रोत

हीच पद्धत नंतर इतर खेळांनी अवलंबली. आणि अशा प्रकारे विश्वचषक सामने हे दर ४ वर्षांनी भरवले जाऊ लागले. यामुळे एक गोष्ट झाली ती म्हणजे विश्वचषक सामन्यांमध्ये एकसमान अंतर आलं. 
४ वर्षांचा कालावधी हा त्याकाळात सुरु झाला ज्याकाळात विमानाने प्रवास करणं सामान्य नव्हतं. खेळाडूंना तयारीसाठी आणि त्यांच्या फिटनेससाठी योग्य वेळ मिळावा म्हणून देखील हा ४ वर्षांचा कालावधी योग्य ठरला.

मंडळी, अशा प्रकारे आजच्या खेळांमध्ये तब्बल ३००० वर्षांपूर्वीचा इतिहास लपलेला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required