पब्जी भारतात बनला असता तर, या माणसाने केलेले चित्रण परफेक्ट आहे
मंडळी पब्जीच्या पॉप्युलारिटीबद्दल आम्ही तुम्हाला सांगायची गरजच नाहीये. आजही पब्जी खेळायचं वेड बिलकुल कमी झालेले नाही. कानात हेडफोन घालून पोचिंकीला उतरायचे का स्कूलला हे ठरवणारे लोक आजूबाजूला दिसतात. पण मंडळी पब्जी हा गेम हा एका कोरियन कंपनीने बनवला आहे. त्यात आपल्याला याआधी महिंद्राचे ट्रॅक्टर दिसले होते खरे, पण पब्जी भारतात बनला असता तर त्याचे चित्र कसे दिसले असते??
मुसतेज एहमद या इंस्टाग्रामरने काही चित्रांच्या माध्यमातून हेच वर्णन केलेले आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतो यात काहीही अतिशयोक्ती नाही. भारताच्या पार्श्वभूमीवर एखादा गेम बनवला तर या सगळ्या गोष्टी कव्हर करायला हव्याच.
मोटरसायकलवरचे भारतीय कुटुंब
एका मोटरसायकलवर जास्तीत जास्त किती लोक बसलेले तुम्ही पाहिले आहेत?