आता सैराटवर आधारित टीव्ही मालिका पण येणार ? टीझर बघून घ्या !!
राव, सैराट येऊन ३ वर्ष पूर्ण झाली तरी सैराटला कॅश करण्याचा नाद सुटता सुटत नाहीय. आता बघा ना, सैराटचं यश बघून वर्षा-दोन वर्षातच रिमेक्सची लाईन लागली होती. करण जोहरने हिंदीत “धडक” बनवला, पंजाबीत “चन्ना मेरेया” बनला, कन्नड मध्ये “मनसु मल्लीगे” आला (यात तर साक्षात रिंकू राजगुरूने काम केलंय), एवढंच नाही तर बंगालीत “नूर जहान, ओडिया भाषेत “लैला ओ लैला” आणि येणाऱ्या काळात तमिळ, तेलगु, मल्याळम भाषेत पण सैराट येणार आहे.
मंडळी, हे फिल्म्स पर्यंत ठीक होतं, पण आता सैराटच्या कथानकावर आधारित एक टीव्ही मालिका येऊ घातली आहे. नाव आहे “जात ना पूछो प्रेम की”. &TV वर १८ जून २०१९ पासून ही मालिका येणार आहे. उत्तर प्रदेश मधल्या पार्श्वभूमीवर सैराटची कथा दाखवण्यात येणार आहे.
९० च्या दशकातल्या पब्लिकला यातला परशा ओळखीचा वाटेल. हा तोच पोरगा आहे ज्याने “शाका लाका बूम बूम” मध्ये मुख्य भूमिका केली होती. आठवलं का ? हा तोच पेन्सिलने गोष्टी बनवणारा. त्याचं नाव आहे किंशुक वैद्य. या मालिकेत त्याला भलतंच ‘जुल्फिकार’ बनवलंय. त्यामुळे अर्ची कोणती नी परशा कोणता हे ओळखू येणं अवघड आहे. असो. तर, आर्चीच्या भूमिकेत आहे नवोदित अभिनेत्री प्रणाली राठोड.
राव, आम्हीच सगळं काय सांगत बसलोय. तुम्ही मालिकेचा टीझर पाहून घ्या. सगळं समजेल.
काय वाटतं ? सैराटच्या कथानकाची जादू जी वर्जिनल सिनेमा सोडून कशावर पण चालली नाही ती टीव्ही मालिकेवर तरी चालेल का ? तुमचं मत द्या राव.