computer

२०१८ गाजवणारे १० सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमे, यातले कोणकोणते सिनेमे तुम्ही पाह्यलेत ? सांगा बरं !!

२०१६ ला सैराट आल्यानंतरचा जवळजवळ एक ते दीड वर्षाचा काळ हा मराठी सिनेमांसाठी वाईट काळ होता. २०१७ साली नाही म्हणायला ‘ती सध्या काय करते’, ‘फास्टर फेणे’, ‘कच्चा लिंबू’, असे दर्जेदार सिनेमे आले, पण त्यांनी बॉक्स ऑफिस गाजवलं नाही. मराठी चित्रपटांनी फक्त आर्ट फिल्म्स करण्याचा ठेका घेतलाय का ? हा प्रश्न त्यावेळी राहून राहून पडत होता. 

यावर्षी मराठी चित्रपटांनी खऱ्या अर्थाने मरगळ झटकली आहे. विशेषतः २०१८ च्या शेवटी मराठी चित्रपटांची गाडी सुस्साट धावू लागली. 'आणि ...डॉ. काशिनाथ घाणेकर', 'नाळ', नुकताच आलेला 'मुळशी पॅटर्न' असे कमर्शियल सिनेमे व 'न्यूड', 'लेथ जोशी' सारख्या आशयघन सिनेमांनी बॉक्स ऑफिस सोबत मराठी चित्रपटांचा दर्जाही कायम राखला. 

मंडळी, २०१८ हे वर्ष गाजवणाऱ्या १० उत्कृष्ट चित्रपटांची यादी आम्ही तयार केली आहे. यातले कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिले आहेत सांगा बरं....

१०. रेडू

९. आपला माणूस

८. गुलाबजाम

७. लेथ जोशी

६. न्यूड

५. बबन

४. फर्जंद

३. मुळशी पॅटर्न

२. नाळ

१. आणि ...डॉ. काशिनाथ घाणेकर

सबस्क्राईब करा

* indicates required