computer

भारतातल्या लोकांच्या नावावर आहेत हे ११ अतरंगी रेकॉर्ड्स !!

मंडळी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये जगभरातील अनेक विचित्र आणि हर तर्हेच्या रेकॉर्ड्सची नोंद झाली आहे. यात भारतीय कसे मागे राहतील राव. पण भारतीयांची एक खासियत आहे. आपण जे रेकॉर्ड केले आहेत ते जगभरात क्वचितच कोणी केले असतील. यातीलच १० अफलातून रेकॉर्ड्स घेऊन आज आम्ही आलो आहोत.

चला तर मंडळी या १० रेकॉर्ड्सवर एक नजर टाकूया :

१. जगातील सर्वात मोठी पगडी

पतियाळा, पंजाबचे अवतार सिंग मौनी (वय वर्ष ६०) यांनी हा रेकॉर्ड केला आहे. त्यांची पगडी ही जगात सर्वात मोठी मानली जाते. ही पगडी तब्बल 2116.14 लांबीची असून त्याचं वजन जवळ जवळ ४५ किलो आहे. ही पगडी परिधान करायला त्यांना ६ तासांचा अवधी लागतो. या वयातही ते समर्थपणे आपली पगडी पेलून आहेत राव.

२. जगातील सर्वात मोठी चपाती

‘दगडूशेठ गणपती सार्वजनिक महोत्सव’, जामनगर (पुण्यात नव्हे) येथे जगातील सर्वात मोठी चपाती तयार करण्यात आली होती. ही चपाती १४५ किलो वजनाची होती. चपाती बनवण्यासाठी १० बाय १० च्या थाळीचा वापर केला गेला होता.

३. सर्वात जास्त महात्मा गांधींच्या वेशातील मुले

कोलकाता मध्ये तब्बल ४८४ मुलांनी महात्मा गांधींचा वेश घेतला होता. महात्मा गांधींच्या वेशात एवढी मुले एकाच ठिकाणी जमण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळेच गिनीज वर्ल्ड रेकोर्ड मध्ये त्याचं नाव कायमचं नोंदवलं गेलं.

४. जगातील सर्वात लांब मिशा

जयपूरचे रामसिंग चौहान हे खऱ्या अर्थाने मिशांचे बादशाहा आहेत. १४ फुट लांब मिशा म्हणजे साधी गोष्ट वाटली का भाऊ. ते गेल्या ३२ पेक्षा जास्त वर्षांपासून मिशा वाढवत आहेत. एवढ्या वर्षांमध्ये त्यांच्या मिशांनी सर्व रेकॉर्ड्स तोडलेत.

५. नाकाने सर्वात जलद टाईप करण्याचा रेकॉर्ड

खुर्शीद हुसेन या युवकाच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. सहसा आपण हातांनी टाईप करतो पण या पठ्ठ्याने थेट नाकाने टाईप करत अजब विक्रम केला आहे. त्याने ४७.४४ सेकंदात ९६ अक्षरे लिहिली होती. त्याला “Guinness World Records has challenged me to type this sentence using my nose in the fastest time.” वाक्य लिहायला सांगितलं होतं आणि त्याने ते सहज करून दाखवलं. त्याने रोज ६ तास सराव करून आपल्या ‘नाकावर’ प्राविण्य मिळवलं आहे.

६. जगातील सर्वात मोठी बिर्याणी

राव बिर्याणी म्हणजे जीव की प्राण असलेल्या पब्लिकला हे वाचून तोंडाला पाणी सुटेल. ६० शेफ्सनी मिळून तब्बल १२००० किलोंची बिर्याणी तयार केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणातील बिर्याणीने जागतिक विक्रम केला नसता तरच नवल.

७. सर्वात जास्त सेल्फी घेण्याचा रेकॉर्ड

राव सेल्फिचा ट्रेंड जगभरात अगदी शिखरावर असताना हा रेकॉर्ड म्हणजे आपल्या भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कोची येथील फेडरल इन्स्टीट्युट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीच्या आवारात तब्बल १००० मुलांनी एकाच वेळी सेल्फी काढून हा रेकोर्ड केला होता.

८. जगातील सर्वात जास्त बोटे असलेला माणूस

देवेंद्र सुतार या व्यक्तीला जगात सर्वात जास्त बोटे आहेत. हात आणि पाय असे मिळून यांची संख्या २८ होते. पायाच्या ‘एक्स्ट्रा’ बोटांमुळे त्याला एक स्पेशल पद्धतीच्या बुटांचा वापर करावा लागतो.

९. जगातील सर्वात लहान गाय

मनिक्याम नावाची अवघ्या ६ फुटांची गाय ही जगातील सर्वात लहान गाय म्हणून ओळखली जाते. ही गाय केरळ मध्ये जन्मली आहे

१०. सर्वात जास्त ‘मिठ्या’ मारण्याचा रेकॉर्ड

हा लय अजब रेकॉर्ड आहे बुवा. आंध्र प्रदेशच्या जयसिंह रविरल या व्यक्तीने तब्बल २,४३६ लोकांची गळाभेट घेऊन हा रेकॉर्ड तयार केलाय. आश्चर्य म्हणजे हे सर्व फक्त १ तासात उरकण्यात आलं होतं.

११. जगातला सर्वात लहान लांबलचक आणि सर्वात छोटा ईमेल आयडी तयार करण्याचा रेकॉर्ड

या सगळ्या वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपला महाराष्ट्राचा राहिल शेख काही कमी नाही हां. त्याच्या नावे एक-दोन नाही, तर चक्क सहा रेकॉर्ड्स आहेत.  जगातला सर्वात लहान लांबलचक आणि त्याचवेळी सर्वात छोटा ईमेल आयडी याच पठ्ठ्याकडे आहे. झालंच तर कम्प्युटरच्या सर्वात जास्त  विंडोज उघडणं आणि बंद करणं, सर्वात जास्त वेळा कम्प्युटर रिफ्रेश करणं असले जरा अतरंगी वाटणारे सहा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहेत

धुळ्याचा राहिल शेख : तब्बल ६ विश्वविक्रम रचणारा मराठी तरुण

 

मंडळी, या १० रेकॉर्ड्समुळे भारत एका वेगळ्या अर्थाने जगाच्या नकाशात उठून दिसतोय !!

 

आणखी वाचा :

गिनीज बुक आणि लिमका बुक...जाणून घ्या विश्वविक्रमांच्या या दोन पुस्तकांमधला फरक !!

बॉलीवूडने केले हे १० अफलातून रेकॉर्डस !!

सबस्क्राईब करा

* indicates required