पुण्यात झणझणीत आणि चटकदार मिसळ मिळण्याची ही २० अफलातून ठिकाणं...बघताय काय, व्हा सामील !!
वडापावच्या लिस्ट नंतर आम्ही घेऊन आलो आहोत समस्त पुणेकरांची जान आणि शान असलेला मिसळपाव. ढॅण्टॅढण !!!
ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अश्या सर्व प्रमुख शहरांमध्ये मिसळ मिळते. त्या त्या भागातल्या चवीनुसार ती भन्नाटच लागते पण मिसळ खावी तर पुण्याचीच. काही वर्षांपुर्वी असं बोललं जात होतं की नाशिक मध्ये मिसळपावच्या सर्वात जास्त व्हरायटी चाखायला मिळतात. पुणेकरांनी मक्तेदारी जाते की काय असं वाटू लागलेलं पण पुण्याने आपला मिसळचा गड अजूनही राखला आहे.
मंडळी पुण्यात सर्वात चांगली मिसळ कुठे मिळते हे पुणेकरांनाच शिकवण्याचा शहाणपणा आम्ही करणार नाही. पण जे बाहेरून पुण्यात येतात, जे मुंबईकर ‘वडापाव’ला घेऊन मिरवतात त्यांच्यासाठी आम्ही आज खास घेऊन आलो आहोत ‘पुण्यातली मिसळपावसाठी प्रसिद्ध असलेली २० ठिकाणं.’ एकदा खाऊन तरी बघा मग बाकी सगळं विसराल राव. विषय भाऊ !!
१. साई छाया मिसळ हाउस
पत्ता १ : हिराबाग चौक, क्षेत्रीय कार्यालयाजवळ, टिळक रोड, पुणे.
पत्ता २ : A/P वेळू, पुणे-बंगलोर महामार्ग, शिवापूर, पुणे.
४. श्रीकला स्नॅक्स उर्फ आबा मिसळवाले
पत्ता : के. ई, एम हॉस्पिटलच्या समोर, गणेश पेठ, पुणे.
१०. जे1 – जेवण
पत्ता : घोळे रोड, शिवाजीनगर, पुणे.
११. अभिजित मिसळ
पत्ता : प्राईड हॉटेल लेन, एल. आय. सी. बिल्डींग समोर, शिवाजीनगर, पुणे.
१२. मस्ती मिसळ
पत्ता १ : अनुपम कॉम्प्लेक्स सोसायटी, कोकण एक्स्प्रेस हॉटेल, कोथरूड
पत्ता २ : डिसिजन टॉवर, सिटी प्राईड सिनेमाच्या बाजूला, सातारा रोड.
१४. निसर्ग मिसळ
पत्ता : जोशी वडेवालेच्या बाजूला, पुणे सोलापूर महामार्ग, हडपसर.
१६. राजकमल मिसळ
पत्ता : यशवंतराव नाट्यगृहाच्या बाजूला, कोथरूड.
१७. शर्वरी रेस्टोरंट
पत्ता : फर्ग्युसन कॉलेज रोड, तुकाराम पादुका चौक, शिवाजीनगर, पुणे.
१८. काटाकिररर...
पत्ता १ : डॉ. केतकर रोड, भोंडे कॉलनी, कलमाडी शाळेच्या जवळ, डेक्कन जिमखाना, पुणे
पत्ता २ : कमिन्स कॉलेज रोड, कर्वे रोड, पुणे.
१९. हॉटेल रामनाथ
पत्ता : टिळक रोड, लिमयेवाडी, सदाशिव पेठ, पुणे.
२०. रुपेश मिसळ
पत्ता : मुक्काम पोस्ट सोमाटणे फाटा, नवीन पुणे मुंबई महामार्ग, तळ मावळ, देहू रोड.
नाव आणि पत्ता दिलाय मंडळी...लवकरात लवकर पुण्याला जायचा प्लॅॅन करा.