computer

गाण्यांच्या आवडीवरून  'जनरेशन गॅप' मोजायची बोभाटाची सोप्पी पध्दत आज वाचा  !

अमुक तमुक माणूस कोणत्या पिढीतला आहे हे समजायला आधार कार्डची वगैरे कही गरज नाही.
उदाहरणार्थ एखादा माणूस वाक्याची सुरुवात 'आच्यावेळी शाळेत असं काही...'अशी करतो तेव्हा समजून जा की तो 'बेबी बूमर' म्हणजे १९७०च्या दशकातला माणूस आहे.अशा बर्‍याच गमती जमती आहेत ज्याचा उपयोग करून आपण 'जनरेशन' ओळखू शकतो.गाण्यांच्या आवडीवरून  'जनरेशन गॅप' मोजायची बोभाटाची सोप्पी पध्दत आज वाचा  !

'सॅड सॉंग्ज जनरेशन'

 जनरेशन क्रमांक एक :'सॅड सॉंग्ज जनरेशन' किंवा मुकेश जनरेशन या जनरेशनच्या १% माणसांचा आयुष्यात एकदाच किंवा ९९% माणसांचा काल्पनिक ब्रेक-अप झालेला असतो यांना  मुकेशची 'सॅड सॉंग्ज' आवडतात.अगदी ३०एम.एल. घेतली की हे मुकेशचं 'दिल जलता है तो जलने दे 'गायला सुरुवात करतात.

'सय्योनी सय्योनी' जनरेशन

जनरेशन क्रमांक दोन  : 'सय्योनी सय्योनी' जनरेशन
दिवसभर काम करणारी - बॅगेतल्या डब्यावर पोट भरणारी- महागाईच्या खाईत पोळून निघालेली ही जनरेशन! प्रेम वगैरे सगळं काहि जागच्याजागी होतं पण कितीही ब्रेक अप होऊ देत, सकाळची 8.55 ची डबल फास्ट,चौथी कट बोगी चुकली नाय पायजे भें***असं म्हणणारी सय्योनी सय्योनी जनरेशन !!

'अर्जित सिंग जनरेशन'

आणि सध्याची...
आईबापानी काटकसर करून लाडात वाढवलेली ही जनरेशन !

पण यांची अदाकारी वेगळीच,आपला टिफिन कोणीतरी आधीच खाऊन टाकलाय हे कळल्यावर रडणार्‍या पोरासारखी 'अर्जित सिंग जनरेशन !!

आता शेवटचा प्रश्न तुम्ही कोणत्या जनरेशनचे ????

सबस्क्राईब करा

* indicates required