computer

भारतात इथे सापडल्या आहेत ५०५ सोन्याच्या मोहरा !!

तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथील जम्बुकेश्वर मंदिराच्या आवारात बागकाम सुरु होतं. दोन तासांनी अचानक कामात अडथळा आला. कामगारांना जमिनीखाली धातूची वस्तू आढळली. ही धातूची वस्तू म्हणजे चक्क तांब्याचं भांडं होतं. या भांड्यात तब्बल ५०५ सोन्याच्या मोहरा होत्या.

जंबुकेश्वर मंदिर हे १८०० वर्षांपूर्वी चोल राजांनी बांधलं. असं म्हणतात की अनेक वर्षापासून मंदिराला देणगी म्हणून सोन्याचे दागिने, चांदीच्या वहाणा मिळत आल्या आहेत. कदाचित या मोहरा देणगीतूनच आल्या असतील. सध्याच्या अंदाजानुसार या मोहरा ७० ते ८२ लाख रुपये एवढ्या किमतीच्या आहेत.

या नाण्यांवर काय दिसतं हेही फार महत्त्वाचं आहे. आकाराने मोठ्या असलेल्या मोहरांवर () अरेबिक अक्षरं कोरलेली आहेत, तर लहान मोहरांवर हिंदू देव दिसतात. या मोहरा नेमक्या कोणत्या काळातल्या आहेत आणि त्या तिथे कशा आल्या याचा तपास इतिहासतज्ञ घेणार आहेत.

तर, सोनभद्रमधली सोन्याची बातमी खोटी असली तरी ही बातमी अगदी खरी आहे बरं. कमेंट आणि शेअर नक्की करा.

सबस्क्राईब करा

* indicates required