computer

फक्त ५००० रुपयांच्या बजेट मध्ये या ८ प्रसिद्ध ठिकाणी फिरा !!

भटकंती तीच असते ज्यात कमीतकमी पैशांमध्ये बरंच काही बघता येईल. आज आम्ही याच वाक्याला जागून तुमच्यासाठी एक खास लेख घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांची ओळख करून देणार आहोत जिथे तुम्ही केवळ ५००० रुपयांमध्ये फिरून येऊ शकता. कमीतकमी बजेट राखून प्रवास करायचा असेल तर या यादीकडे एकदा बघायलाच पाहिजे.

१. बिन्सर

बिन्सर हे उत्तराखंडच्या पहाडी भागांत वसलेलं छोटसं शहर आहे. उत्तराखंडच्या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर या गावाला एकदा भेट द्यायलाच हवी. या ठिकाणी जाण्यासाठी बऱ्याच बसेस आणि टॅक्सी  उपलब्ध आहेत.  तुम्हाला उत्तराखंडच्या नैनिताल आणि अल्मोरा भागातून  या बसेस मिळतील. आता खर्चाचं पाहूया.

प्रवासाचा खर्च – एकवेळचा खर्च १००० रुपयांपर्यंत.
राहण्याचा खर्च – ५०० रुपयांपासून पुढे.
जेवण आणि फिरण्याचे –  दरदिवसाला ५०० रुपये.

२. मुक्तेश्वर

भटकंती आणि  ॲडव्हेन्चर आवडत असेल तर उत्तराखंडचं मुक्तेश्वर हा उत्तम पर्याय असू शकतो. या ठिकाणी तुम्ही क्लाइम्बिंग, कॅम्पिंग, पॅराग्लाइडिंगचा आनंद घेऊ शकता. मुक्तेश्वरला जाण्यासाठी तुम्हाला दिल्ली ते काठगोदम आणि काठगोदम ते मुक्तेश्वर असा प्रवास करावा लागेल.

प्रवासाचा खर्च – एकवेळचे ७०० ते २००० रुपये (बस किंवा ट्रेननुसार हे भाडं बदलेल)
राहण्याचा खर्च – एका दिवसासाठी ५०० रुपयांपर्यंत कमी खर्च येऊ शकतो.
जेवण आणि फिरण्याचे – दर दिवसाच्या हिशोबाने ८०० ते १०००.

३. वाराणसी.

जगातलं सर्वात जुनं शहर म्हणून वाराणसी ओळखलं जातं. वाराणसीतले घाट, मंदिरं, वास्तूशैली प्रसिद्ध आहे. एकट्या काशी भागातच तुम्हाला तब्बल १६०० पेक्षा जास्त मंदिरं बघायला मिळतील. इथे जाण्यासाठी तुम्हाला रेल्वे सहज मिळू शकते.

प्रवासाचा खर्च – प्रवासाचं एकवेळचं भाडं ४२० रुपयापर्यंत असू शकतं.
राहण्याचा खर्च – एका दिवसासाठी तुम्हाला १५० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
जेवण आणि फिरण्याचे – ५०० ते ७०० रुपये.

४. अमृतसर

अमृतसर हे शिखांचं एक पवित्र शहर आहे. सुवर्ण मंदिर हे या शहराचं मुख्य आकर्षण असलं तरी जालियानवाला बाग आणि वाघा बॉर्डर ही दोन ठिकाणं महत्वाची आहेत. शिवाय अमृतसर हे शहर पण फिरण्यासारखं आहे. अमृतसरला जाण्यासाठी रेल्वे हा सर्वात चांगला पर्याय असू शकतो.

प्रवासाचा खर्च – एकवेळच्या प्रवासासाठी ५०० रुपयांपर्यंत.
राहण्याचा खर्च – ५०० रुपयांपासून सुरुवात.
जेवण आणि फिरण्याचे – प्रत्येक दिवसाप्रमाणे ५०० ते ८०० रुपये.

५. जयपूर

जयपूर हे राजस्थानचं मुख्य आकर्षण म्हणता येईल. या भागात काय काय पाहता येईल याची यादी फार मोठी आहे. हवा महाल, जयगड किल्ला, आमेर किल्ला, जलमहाल, जंतरमंतर, बिर्ला मंदिर आणि बरंच काही.

प्रवासाचा खर्च – एकवेळचा खर्च ३०० रुपयांपर्यंत.
राहण्याचा खर्च – ५०० रुपयांपासून पुढे.
जेवण आणि फिरण्याचे – ५०० ते १०० रुपये

६. दिव आणि दमण

दिव आणि दमण स्वस्त मद्य आणि समुद्र किनाऱ्यांसाठी ओळखलं जातं. भटकंती आणि पार्टी करण्यासाठी याहून हटके ठिकाण काय असेल राव. खासकरून मुंबईकरांसाठी हे ठिकाण फारच जवळ आहे.

प्रवासाचा खर्च – २०० ते ५००
राहण्याचा खर्च – ४५० रुपयांपासून पुढे.
जेवण आणि फिरण्याचे – २५० ते ७०० रुपये.

७. कन्याकुमारी

कन्याकुमारी हे भारताचं दक्षिण टोक. या भागात पाहण्यासारखी अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत. कन्याकुमारी मंदिर, विवेकानंदांचं भव्य स्मारक, प्रसिद्ध तमिळ कवी तिरुवल्लुर यांची मूर्ती तसेच उदयगिरी किल्ला पण बघण्यासारखा आहे.

प्रवासाचा खर्च – १०० रुपयांपर्यंत
राहण्याचा खर्च – ७०० रुपयांपासून पुढे.
जेवण आणि फिरण्याचे – ८०० ते १२०० रुपये.

८. दार्जीलिंग

हिरव्यागार निसर्गातून जाणारी ट्रेन, चहाच्या बागा, जवळच असलेला हिमालय अशा अनेक कारणांनी दार्जीलिंगला आपल्या लिस्टमध्ये असतोच असतो. दार्जीलिंगला जाण्यासाठी कोलकाता हे जवळचं शहर आहे. कोलकाता भागातून दार्जीलिंगसाठी ट्रेन मिळेल.

प्रवासाचा खर्च – १००० रुपयांपर्यंत
राहण्याचा खर्च – ४५० रुपयांपासून पुढे.
जेवण आणि फिरण्याचे – ५०० ते १००० रुपये.


तर मंडळी, आम्ही तुम्हाला स्वस्त आणि मस्त ठिकाणं सुचवली आहेत. आता तुम्हीच ठरवा कुठे जायचं ते.

 

आणखी वाचा :

महाराष्ट्रात सहलीसाठी जायची ८ बेष्ट ठिकाणं? तुम्ही कुठे जाणार आहात ??

उन्हाळ्याच्या सुटीत या ठिकाणी जायचा विचारही करू नका..

सबस्क्राईब करा

* indicates required