computer

जागतिक तापमानवाढीमुळे इंग्लंडमधल्या झाडात ६ कोटी वर्षानंतर हा महत्त्वाचा बदल घडून आलाय !!

हवामान बदल ही गेल्या काही वर्षांपासून महत्वाची समस्या बनली आहे. येणाऱ्या प्रत्येक वर्षागणिक हवामानातील बदल तीव्रपणे जाणवू लागले आहेत. म्हणूनच जगभर हवामानातील बदल रोखण्यासाठी, पृथ्वीच्या तापमानात समतोल राखण्यासाठी अनेक उपक्रम, करार, चर्चासत्र घेतली जात आहेत आणि जर प्रदूषण असंच वाढत राहिलं तर हे प्रयत्न आणखी वाढवावे लागतील.

एकंदर सगळी परिस्थिती ही मनात धडकी भरवणारी आहे. पण यात देखील काही घटना या दिलासा देणाऱ्या घडत आहेत. ब्रिटनमध्ये घडलेली एक घटना वाचून तुम्हाला देखील एकाच वेळी धक्का बसेल आणि आनंद देखील होईल.

ब्रिटनमध्ये सायकास नावाच्या झाडाला फुलासारखे दोन वेगवेगळ्या प्रकारचे कोन दिसून आले आहेत. हा कोन म्हणजे स्त्री केसर आणि पुंकेसर आहेत. आता तुम्ही म्हणाल की यात काय नवीन, प्रत्येक फुल झाडाला स्त्री केसर, पुंकेसर असतं. तर, आम्ही ज्या झाडाबद्दल बोलत आहोत त्या झाडाला गेल्या 6 कोटी वर्षांपासून पहिल्यांदाच स्त्री केसर आणि पुंकेसर असे दोन्हीही कोन दिसून आले आहेत. ६ कोटी म्हणजे ज्याकाळी डायनासॉर होते तो काळ. आहे ना गमतीदार गोष्ट ?

(पुंकेसर)

७ वर्षांपूर्वी या झाडावर पहिल्यांदा पुंकेसर दिसून आलं होतं. यावेळी स्त्रीकेसरही दिसून आलं आहे. आता प्रश्न पडतो की एवढे वर्षे हे का घडून आलं नाही? त्याला कारण म्हणजे हवामानातील बदल. मागच्या दहा वर्षात जी तापमानात वाढ झाली त्या कारणाने सायकास झाडाला पुंकेसर आणि स्त्रीकेसर असलेले कोण दिसून आले आहेत. एकीकडे तापमानवाढीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असताना,  नवे झाडे अस्तित्वात येणे काहीसे विचित्र पण सकारात्मक संकेत देणारे आहे.

सायकास हे झाड आता इंग्लंड मधल्या इसले ऑफ वेट येथे लावण्यात आले आहे. तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की स्त्रीकेसर आणि पुंकेसर उपलब्ध असल्याने आता परागीकरण घडवून आणता येईल.

तर वाचकहो, काय म्हणाल या घटनेबद्दल?

सबस्क्राईब करा

* indicates required