मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

नासाने पोस्ट केलाय बर्फाच्छादित हिमालयाचा फोटो...हा फोटो खरा की खोटा?

2 मिनिट वाचन
शेअर करा:
नासाने पोस्ट केलाय बर्फाच्छादित हिमालयाचा फोटो...हा फोटो खरा की खोटा?

दरवर्षी दिवाळीला एक फोटो व्हायरल होत असतो. या फोटोत दिवाळीच्या रात्री भारत कसा झगमगतो हे दाखवलेलं असतं. हा फोटो गेली बरीच वर्षे व्हायरल होतो आहे. व्हायरल होण्याचं एक कारण म्हणजे हा फोटो खुद्द नासाने प्रसिद्ध केला आहे असा दावा केला जातो. नासाने असा फोटो खरंच शेअर केला आहे का? नासा असे फोटो शेअर करते का? 

तर सत्य हे आहे की, तो फोटो एडिट केलेला आहे. २००३ मध्ये नॅशनल ओसनिक अँड एटमॉस्फेरिक या ॲडमिनिस्ट्रेशनने काढलेले अनेक सॅटेलाईट फोटो एकत्र करून तो फोटो वायरल केला गेला. आज हा फोटो इंटरनेटवर फिरणाऱ्या सर्वात प्रसिद्ध फेक फोटोंमध्ये जाऊन बसलाय.

नासाने पोस्ट केलाय बर्फाच्छादित हिमालयाचा फोटो...हा फोटो खरा की खोटा? – चित्र 1

असे वाईट वाटून घेऊ नका, अनेक खोटे फोटो असेच फिरत असतात. मात्र नुकताच नासाने अधिकृतपणे इन्स्टाग्रामवर भारताचा फोटो प्रसिद्ध केला आहे. हा लॉंग exposure फोटो आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातल्या(International Space Station) एका कर्मचाऱ्याने घेतलेला आहे. 

काय दिसतंय या फोटोत?

या फोटोमध्ये हिमालयाच्या पांढऱ्याशुभ्र रांगा अतिशय सुरेख दिसत आहेत. हिमालय आणि त्या भागात सध्या अनेक ठिकाणी हिमवर्षाव (snowfall) होत आहे. त्यामुळे अस वाटतंय की हिमालयावर बर्फाची चादर पसरली आहे. नासाने प्रसिद्ध केलेल्या या फोटोत राजधानी दिल्ली आणि पाकिस्तानचे लाहोर शहरही दिव्यांच्या झगमगाटात चमकताना दिसत आहे. 

नासाने प्रसिद्ध केल्यापासून हा फोटो चर्चेत आहे. फोटोला लाखो लाईक्स मिळाले असून हा फोटो सगळीकडे व्हायरल होताना दिसतोय. तुम्हीही बघून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा फोटो.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र
लाइफस्टाइल

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र

१९९१ च्या गल्फ वॉरमध्ये जळालेल्या इराकी सैनिकाचे छायाचित्र घेणारे केनेथ जारेके आणि त्या एका फोटोने मांडलेले युद्धाचे विदारक वास्तव.

२४ ऑगस्ट, २०२६

शेअर एक, फायदे अनेक: गुंतवणुकीवर मिळवा फ्री पिझ्झा आणि हॉटेल ताजमधील स्टे!
लाइफस्टाइल

शेअर एक, फायदे अनेक: गुंतवणुकीवर मिळवा फ्री पिझ्झा आणि हॉटेल ताजमधील स्टे!

केवळ एका शेअरच्या गुंतवणुकीवर कंपन्या कशा पद्धतीने हॉटेल सवलत, फ्री फूड आणि गिफ्ट व्हाउचरचे अनोखे फायदे देतात.

६ ऑगस्ट, २०२६

पाडल्या जाणाऱ्या इमारतीला ४३ मॉडेल्सच्या मदतीने अमर करणारे ऐतिहासिक छायाचित्र!
लाइफस्टाइल

पाडल्या जाणाऱ्या इमारतीला ४३ मॉडेल्सच्या मदतीने अमर करणारे ऐतिहासिक छायाचित्र!

छायाचित्रकार ऑर्मंड गिग्ली यांनी न्यूयॉर्कमधील पाडल्या जाणाऱ्या इमारतीच्या खिडक्यांमध्ये ४३ महिलांना उभे करून काढलेल्या प्रसिद्ध फोटोची गोष्ट.

२२ जून, २०२६

तेजस विमानाचा नेमका काय 'लोचा' झालाय? HAL चे शेअर्स का पडले?
लाइफस्टाइल

तेजस विमानाचा नेमका काय 'लोचा' झालाय? HAL चे शेअर्स का पडले?

तेजस विमानाचे अपघात आणि इंजिन मिळण्यास होणारा विलंब यामुळे HAL चे शेअर्स गडगडले आहेत. या तांत्रिक अडचणींमागील नेमके कारण काय?

२३ फेब्रुवारी, २०२६