मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

तेजस विमानाचा नेमका काय 'लोचा' झालाय? HAL चे शेअर्स का पडले?

2 मिनिट वाचन

तेजस विमानाचे अपघात आणि इंजिन मिळण्यास होणारा विलंब यामुळे HAL चे शेअर्स गडगडले आहेत. या तांत्रिक अडचणींमागील नेमके कारण काय?

शेअर करा:
तेजस विमानाचा नेमका काय 'लोचा' झालाय? HAL चे शेअर्स का पडले?

तेजसचा काय 'लोचा' झालाय? आज सकाळी हिंदुस्थान एरॉनॉटिक्स (HAL) च्या शेअरचे भाव धडाधड पडताना बघून अनेक गुंतवणूकदारांच्या छातीत धडधड सुरु झाली.शेअर्सच्या भावातल्या या घसरणीमागे भारतीय हवाई दलाने घेतलेला 'तेजस' या विमानाची उड्डाणे थांबवण्याचा निर्णय आहे. पण असं नेमकं झालंय तरी काय ?

तेजसचा काय 'लोचा' झालाय?

७ फेब्रुवारी २०२६ रोजी एका सरावादरम्यान तेजस विमान रनवे सोडून बाहेर गेले.गेल्या २४ महिन्यांत भारतीय बनावटीच्या 'तेजस' विमानाचा हा तिसरा मोठा अपघात ठरला आहे. या घटनेनंतर भारतीय हवाई दलाने ताफ्यातील सर्व ३० तेजस विमानांची उड्डाणे तूर्तास थांबवली आहेत.

विमानाचे 'ग्राउंडिंग' होणे ही कोणत्याही हवाई दलासाठी चिंतेची बाब असते. प्राथमिक तपासानुसार, या ताज्या अपघातामागे 'ब्रेक फेल' झाल्याचे तांत्रिक कारण समोर येत आहे. सुदैवाने वैमानिक सुरक्षित असला तरी विमानाचे मोठे नुकसान झाले आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की, तेजसच्या 'मार्क १-ए' या प्रगत आवृत्तीची डिलिव्हरी आधीच दोन वर्षे उशिरा सुरू आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (HAL) मार्च २०२४ मध्ये ही विमाने द्यायची होती. मात्र, आता एप्रिल २०२६ उजाडला तरी हवाई दलाची प्रतीक्षा संपलेली नाही.

या विलंबामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकन कंपनी 'जीई' (General Electric). या विमानांना लागणारी 'एफ-४०४' इंजिने वेळेवर पुरवण्यात ही कंपनी अपयशी ठरली आहे. आतापर्यंत केवळ पाच इंजिने भारताला मिळाली असून नऊ विमाने इंजिनअभावी कारखान्यात उभी आहेत.

तेजसमध्ये केवळ इंजिनचाच लोचा नाही. कॅगच्या (CAG) अहवालानुसार, या विमानात ५३ पेक्षा जास्त तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. यात विमानाचे वाढलेले वजन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिममधील अडचणींचा समावेश आहे.

इस्त्रायली रडार आणि भारतीय 'अस्त्र' क्षेपणास्त्रांचे एकत्रीकरण करतानाही सॉफ्टवेअरचे अडथळे येत आहेत. यामुळे हवाई दलाने काही अटी शिथिल करून विमाने स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. पण वारंवार होणारे अपघात या विमानाची विश्वासार्हता धोक्यात आणत आहेत.

एकीकडे आपण 'आत्मनिर्भर' होण्याचे प्रयत्न करतोय पण इंजिनसाठी आजही अमेरिकेच्या दारात उभे राहावे लागते.दुबई एअर शोमध्ये झालेला अपघात आणि आताची घटना यामुळे तेजसच्या निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो.

अशा परिस्थितीत, स्वदेशी बनावटीचे हे विमान खरंच जागतिक दर्जाचे ठरेल की तांत्रिक अडचणींच्या गर्तेतच अडकून राहील?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

एका डोळ्याने पाहिलेलं आयएएसचं स्वप्न: कॅन्सर आणि यूपीएससीविरुद्ध संजय डहरियाचा लढा
लाइफस्टाइल

एका डोळ्याने पाहिलेलं आयएएसचं स्वप्न: कॅन्सर आणि यूपीएससीविरुद्ध संजय डहरियाचा लढा

पॅरोटिड कॅन्सरशी झुंज देत, चार शस्त्रक्रिया सहन करत तब्बल १४ वर्षांच्या संघर्षानंतर यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या संजय डहरियाची गाथा.

३० जून, २०२६

चाकू-कात्री न वापरता मेंदूची शस्त्रक्रिया! 'गॅमा नाईफ'चा चमत्कार समजून घ्या!
आरोग्य

चाकू-कात्री न वापरता मेंदूची शस्त्रक्रिया! 'गॅमा नाईफ'चा चमत्कार समजून घ्या!

कवटी न फोडता आणि टाके न घालता मेंदूतील गाठींवर अचूक उपचार करणारे 'गॅमा नाईफ' रेडिएशन तंत्रज्ञान नेमके कसे कार्य करते?

९ सप्टेंबर, २०२६

एन.के.पी. साळवेंनी असा उतरवला इंग्रजांचा माज आणि भारतात आणला वर्ल्ड कप!
क्रीडा

एन.के.पी. साळवेंनी असा उतरवला इंग्रजांचा माज आणि भारतात आणला वर्ल्ड कप!

१९८३ च्या वर्ल्ड कप फायनलवेळी झालेल्या एका अपमानाचा बदला एन.के.पी. साळवेंनी कसा घेतला, याची ही रंजक कथा.

९ मार्च, २०२६