ट्राफिकचा नियम मोडण्यासाठी त्याने गाडीत सांगाडा का ठेवला ?
लोक नियम मोडण्यासाठी काहीही करू शकतात. या म्हाताऱ्या आजोबांना पाहा. या आजोबांनी HOV म्हणजे high-occupancy vehicle च्या लेनमध्ये जागा मिळावी म्हणून गाडीत चक्क खोटा मानवी सांगाडा ठेवला होता.
अमेरिकेत HOV लेन ही एकापेक्षा जास्त माणसं असलेल्या गाड्यांसाठी राखीव ठेवलेली असते. या आजोबांनी या HOV मध्ये शिरण्यासाठी एका खोट्या मानवी सांगाड्याला ड्राईव्हर सीटच्या शेजारी बसवलं, खरोखर माणूस बसला आहे हे भासवण्यासाठी त्याला टोपी घातली, कपडे घातले. पण ट्राफिक पोलिसांना टोपी घालणं त्यांना काही जमलं नाही.
अॅरिझोनाच्या The Department of Public Safety विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजोबांना पकडलं. त्यांनीच हा फोटो ट्विट केला आहे.
Think you can use the HOV lane with Skeletor riding shotgun? You’re dead wrong! ☠︎ One of our motor troopers cited the 62-year-old male driver for HOV & window tint violations on SR-101 near Apache Blvd this morning. #NiceTry #YoureNotHeMan #AZTroopers pic.twitter.com/wQYY831mNY
— Dept. Public Safety (@Arizona_DPS) January 23, 2020
२०१९ च्या एप्रिलमध्ये असाच प्रयत्न एका व्यक्तीने केला होता. त्याने एका पुतळ्याला कपडे , टोपी आणि सनग्लासेस घालून ड्राईव्हर सीटच्या शेजारी बसवलं होतं. तोही पकडला गेला होता.
तर मंडळी, जिथे कायदे आहेत तिथे त्यांना तोडण्यासाठी अशा कल्पना तयार होतातच. तुम्ही असा एखादा जुगाड पाहिला आहे का? पाहिला असेल तर तो किस्सा नक्की सांगा.