अझीम प्रेमजीं आणि त्यांच्यासारखे अनेक उद्योगपती - अमिताभ बच्चन आणि इतर कलाकार - सामाजिक कामांसाठी सर्वाधिक दान करणारे भारतीय अब्जाधीश कोण आहेत?
जगात नवनवीन याद्या प्रसिद्ध होत असतात. काही याद्यांमुळे आपल्या रोजच्या जगण्यात काही फरक पडत नसला तरी सामान्य ज्ञान म्हणून अशा याद्या वाचल्या तरी काही हरकत नाही. हरून इंडिया फिलाँथ्रोपी नावाची यादी काही दिवसांपूर्वी प्रसिध्द झाली. सामाजिक कामांसाठी सर्वाधिक दान करणाऱ्या भारतीय उद्योगपतींची/अब्जाधीशांची ही यादी असते. आजही कोट्यवधी लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगतात. या अब्जाधीश उद्योगपतींपैकी कोण समाजाबद्दल असलेल्या बांधीलकीतून मोठा दानधर्म करतात अशा लोकांच्या यादीबद्दल आपण आज बोलणार आहोत. वाचा तर मग ही यादी..
१) अझीम प्रेमजी
इतर उद्योगपतींच्या तुलनेने अझीम प्रेमजी खूप श्रीमंत नसले तरी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग ते दान करतात. विप्रो या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक असलेल्या प्रेमजी यांनी या वर्षी ९,७१३ कोटींचे दान केले आहे. म्हणजेच दिवसाला २७ कोटी रुपये. दान करणाऱ्या उद्योगपतींच्या यादीत त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी पहिला क्रमांक मिळवला आहे.
२) शिव नादर
एचसीएल या टेक्नॉलॉजी कंपनीचे शिव नादर यांनी यावर्षी १,२६३ कोटींचे दान केले आहे. तेही गेल्या वर्षीप्रमाणे या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांनी कला, संस्कृती आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात दान केले आहे.
३) मुकेश अंबानी
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांनी यावर्षी ५७७ कोटींची मदत केली आहे. आपत्ती व्यवस्थापनसाठी त्यांनी ही मदत केली आहे.
४) कुमार मंगलम बिर्ला
आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम बिर्ला यांनी यावर्षी गेल्यावर्षाच्या तुलनेने ४७ टक्के अधिक दान करत ४ था क्रमांक मिळवला आहे. ३७७ कोटी एवढी मदत त्यांनी यावर्षी केली आहे. त्यांनी अधिक मदत ही आरोग्य क्षेत्रात केली आहे.
५) नंदन निलेकनी
नंदन निलेकनी हे देशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत. तसेच आधार या संकल्पनेत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. त्यांनी आपल्या संपत्तीतून १८३ कोटी यावर्षी दान दिले आहेत.
६) हिंदुजा कुटुंब
हिंदुजा ग्रुप ज्या हिंदुजा बंधूंच्या माध्यमातून चालवला जातो, त्यांनी १६६ कोटींची मदत केली आहे. त्यांची मदत ही जलसंवर्धन आणि शिक्षण यात झाली आहे.
७) बजाज ग्रुप
ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी बजाज ग्रुपकडून १३६ कोटींची मदत करण्यात आली आहे.
८) गौतम अदानी
गेल्या काही वर्षात प्रचंड वेगाने श्रीमंत झालेले गौतम अदानी यांनी यावर्षी १३० कोटींची मदत आपत्ती व्यवस्थापनात केली आहे.
९) अनिल अग्रवाल
अनिल अग्रवाल हे वेदांत ग्रुपचे चेयरमन आहेत. १३० कोटींची मदत त्यांनी यावर्षी केली आहे.
१०) बर्मन कुटुंब
डाबर इंडिया ही कंपनी बर्मन कुटुंबाच्या मालकीची आहे. या यादीत त्यांचा क्रमांक दहावा आहे. त्यांनी ११४ कोटींची मदत केली आहे.
या यादीत अजून काही मोठी नावे सुद्धा आहेत.
१) राकेश झुनझुनवाला
भारताचे वॉरन बफे समजले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी ५० कोटी दान केले आहेत.
२) हसमुख चूडगर
इंट्स फार्माचे हसमुख चूडगर आणि कुटूंबाने देशातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणेसाठी २९ कोटी दिले आहेत.
३) अक्षय कुमार
प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारने कोरोना काळात २६ कोटी रुपये दान केले आहेत.
४) नितीन आणि निखिल कामत
झिरोधा या ट्रेडिंग ऍपच्या माध्यमातून अब्जाधिश झालेल्या कामत बंधूंनी यावर्षी २५ कोटींची मदत केली आहे.
५) अमिताभ बच्चन
कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून अमिताभ बच्चन यांनी १५ कोटींचे दान केले आहे.
६) राधा वेम्बु आणि वेम्बु सेकर
झोहो या कंपनीच्या प्रोमोटर असलेल्या राधा वेम्बु यांनी १२ तर कंपनीचे दुसरे प्रोमोटर वेम्बु सेकर यांनी ९ कोटींची मदत केली आहे.
७) विनोद कुमार अग्रवाल
अग्रवाल कोल कॉर्पोरेशनचे संचालक विनोद कुमार अग्रवाल यांनी आरोग्य क्षेत्रात ११ कोटींची मदत केली आहे.
८) मंगल प्रभात लोढा
मुंबई येथील प्रसिद्ध रियल इस्टेट व्यवसायिक आणि राजकीय नेते मंगल प्रभात लोढा यांनी यावर्षी ९ कोटींची मदत केली आहे.
९) राजीव आणि रवींद्र कुमार
राजीव आणि रवींद्र कुमार हे फास्ट मुविंग कंज्युमर गुडसशी संबंधित आहेत. यावर्षी त्यांनी २८ कोटींची मदत केली आहे. तर
उदय पाटील