बाहुबली सारखं हत्तीच्या सोंडेवर चढायला गेला आणि....तुम्हीच बघा पुढे काय झालं !!
आपण अनेकदा सिनेमातील नट नट्यांच कॉपी करायला जातो. म्हणजे, हेअर स्टायल, चालणे, बोलणे, डायलॉगची नक्कल करणे, अॅक्शन करणे, वगैरे. मंडळी आपण सिनेमाचे खूप मोठे फॅन असलो तरी काही वेळा ही नक्कल जीवावर बेतू शकते. जसं की या घटनेत झालं.
तुम्हाला आठवत असेल, ‘बाहुबली २’ सिनेमाच्या सुरुवातीलाच एक सीन आहे ज्यात बाहुबली चक्क सोंडेवरून हत्तीच्या पाठीवर जाऊन बसतो. हा सीन प्रभासने अफलातून साकार केलाय कारण शुटींग दरम्यान कोणताही अपघात होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली गेली होती.
बाहुबलीच्या एका मोठ्या फॅनने हाच सीन खऱ्या आयुष्यात करून बघितला पण हा हत्ती खऱ्या आयुष्यातील आहे हे कदाचित तो विसरला होता. या व्यक्तीचं नाव आहे जीनु जॉन. जीनु जॉन हत्तीच्या दोन्ही दातांना पकडून वर चढायच्या तयारीत असतानाच हत्तीने सोंडेच्या सहाय्याने त्याला जोरदार मागे फेकले आणि त्याची शुद्ध हरपली. सुदैवाने त्याचा जीव वाचला, पण त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. असं म्हणतात की त्याने दारूच्या नशेत हा प्रकार केला. केरळच्या करीमन्नुर येथे ही घटना घडली. हे सगळं एका व्हिडीओत कैद झालं असून हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात एका व्यक्तीने बाहुबलीचा धाबधब्यावरून उडी मारण्याचा सीन कॉपी करण्याच्या नादात जीव गमावला होता.
मंडळी, सिनेमाचा मोठा प्रभाव आपल्या मनावर होत असतो पण सिनेमात आणि खऱ्या आयुष्यात फरक आहे हे विसरून चालणार नाही.