देशाचा वीर जवान...९ गोळ्या लागूनही जिवंत!!!
देवाचा हात म्हणा किंवा नशीबाची साथ माणसाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात जेव्हा फक्त चमत्कारच त्याला बाहेर काढू शकतो. चेतनकुमार चिता या जवानाच्या आयुष्याकडे बघितले कि याची प्रचीती येईल. जम्मू-काश्मीर मध्ये लढत असताना चेतनकुमारला एक नाही दोन नाही तर तब्बल 9 गोळ्या लागल्या. साधी एक गोळी जरी लागली तरी माणूस जिवंत राहणं मुश्कील पण इथे तर 9 गोळ्या झेलूनही चेतनकुमार सुखरूप वाचला आहे.
चेतनकुमारला जेव्हा हॉस्पिटल मध्ये आणले तेव्हा त्याचा सांधा फ्रॅक्चर झाला होता, त्याच्या डोक्यात गोळी शिरली होती तसेच डोळ्यालाही मार लागला होता. त्याच्या डोक्याला किती मार लागला आहे याची तपासणी केली असता त्यांचा स्कोर M3 निघाला. ते कोमात गेले होते.
१४ फेब्रुवारी रोजी काश्मीर बांदीपोरा येथे झालेल्या चकमकीत तीन जवान ठार झाले तर एक दहशतवादी मारला गेला होता. जखमी अवस्थेतील चेतनकुमार चिता यांना श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात आणण्यात आले पण त्यांची स्थिती नाजूक असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले.
महिनाभर कोमात राहिल्यानंतर आता चेतनकुमार शुद्धीवर आले आहेत. फक्त शुद्धीवर नाहीत तर चेतनकुमार आता आपल्या घरीही परतू शकतात असे डॉक्टरांनी सांगितले. एवढ्या जीवघेण्या हल्यातून बचावणे हे कोणत्याही चमात्कारापेक्षा कमी नाही असे सर्व स्थरातून म्हटले जात आहे.
एक मात्र खरं की देव तारी त्याला कोण मारी !!!
बरोबर ना ?