computer

हिमालयात न जाता बघा 'छोटं लडाख' !!

लडाखला जायचा विचार करताय, पण जमून येत नाहीये ? आम्ही आज तुम्हाला लडाख सारखाच एक मस्त डेस्टिनेशन सुचवणार आहोत जो तुमच्या बजेट मध्येही बसेल आणि तुम्हाला लडाखला जायचा आनंदही मिळेल. हा डेस्टिनेशन पॉईंट आहे बंगळूरचा ‘छोटा लडाख’ !!

छोटा लडाख म्हणजे त्याला लडाखची वाईट कॉपी समजू नका. लडाखची आठवण करून देणारे पांढरेशुभ्र दगड आणि काचे सारख्या स्वच्छ पाण्याने हा परिसर भरला आहे. काहीकाळासाठी हा परिसर आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जातो. 
 

कोठे आहे ?

बंगळूर पासून ६० किलोमीटरवर असलेल्या अरभीकोठानुर, कोलार येथे हा छोटा लडाख आहे. हिरवळ, डोंगरदऱ्या, लॉंग ड्राईव्हज आवडणाऱ्यांसाठी हा एक मस्त डेस्टिनेशन ठरू शकतो. या संपूर्ण भागातून पाणी उपसून काढलं जातं, त्यामुळे येथे डोंगरांनी वेढलेली स्वच्छ तळी पाहायला मिळतात. पावसाळ्यात तर ही तळी पांढऱ्या गुलाबांनी भरून जातात.

कसं जायचं ?

छोटा लडाखला जाण्यासाठी बंगळूरच्या केंडट्टी गावातून जावं लागतं. या भागातले रस्ते अरुंद असल्याने थोडी अडचण होई शकते, पण ड्राईव्हच्या कट्टर चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. पहिल्यांदा जाताना स्थानिक लोकांची मदत जरूर घ्या.

कधी जावं ?

हिवाळा आणि पावसाळा हे दोन ऋतू हा भाग पाहण्यासाठी उत्तम समजले जातात. या दोन ऋतुंमध्ये या भागात हिरवळ आणि ताजेपणा भरलेला असतो. सोबत खाण्यापिण्याच्या वस्तू जवळ बाळगायला विसरू नका, कारण या भागात हॉटेल काय साधं दुकान पण नाही. 

महत्वाची सूचना

तलावाजवळ जाताना पोहण्याचा मोह आवरा. या भागात पोहण्याच्या मोहापायी लोकांना जीव गमवावा लागलाय. हा भाग मित्रांसोबत फिरण्या सारखा आहे, त्यामुळे ग्रुपने गेल्यास आणखी मजा येईल.

तर मंडळी, छोट्या लडाखचं स्वतःचं असं वेगळेपण नक्कीच आहे. थर्टीफर्स्टचा प्लॅन अजून केला नसेल तर छोट्या लडाख बद्दल नक्की विचार करा. मित्रांना याबद्दल माहिती मिळावी म्हणून ही पोस्ट शेअर करायला विसरू नका !!

सबस्क्राईब करा

* indicates required