computer

हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, रिसॉर्ट, धाबा... या सगळ्यांमध्ये काय फरक आहे भाऊ? जाणून घ्या बरं...

मंडळी, हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, धाबा, कॅन्टीन, रिसॉर्ट, अशा अनेक जागी खाण्यापिण्याच्या सेवांचा उपभोग तुम्ही अगदी आनंदाने घेत असाल. तुमच्या दैनंदिन चर्चेतही हे शब्द अनेकवेळा येत असतील. पण तुम्हाला काय वाटतं? या सगळ्या सेवासुविधा एकाच प्रकारच्या आहेत का? खरंतर नाहीत. नावानुसार या प्रत्येक ठीकाणाच्या सेवेच्या प्रकारात बदल होत जातो. या सगळ्यांमध्ये नेमका फरक काय आहे बरं? चला जाणून घेऊया...

हॉटेल

हॉटेल ही अशी जागा आहे जिथं तुम्हाला राहायला खोली आणि जेवायला जेवण मिळतं. सोबतच त्या-त्या हॉटेलच्या दर्जानुसार टिव्ही, वायफाय, लॉन्ड्री, फ्रीज अशा इतर सेवाही तिथे मिळतील. पण हॉटेलचं मुख्य काम आहे, ग्राहकाला जेवण आणि राहण्यासाठी खोली उपलब्ध करून देणं. नाहीतर आपण खायला मिळणार्‍या प्रत्येक ठिकाणाला हॉटेलच म्हणतो. नाही का?

मॉटेल

हा हॉटेलचाच पण त्यापेक्षा थोडा लहान प्रकार आहे. मॉटेल हा शब्द मोटर + हॉटेल या दोन शब्दांपासून बनलाय. लांबचा प्रवास करणार्‍या लोकांसाठी विश्रांती म्हणून मॉटेलमध्ये राहायला खोली आणि त्यांच्या गाड्यांसाठी खुल्या पार्किंगची सुविधा दिली जाते. मॉटेल्स ही खासकरून हायवेच्या किंवा रस्त्यांच्या शेजारीच असतात. काही मॉटेल्सकडून जेवणाची सुविधाही दिली जाते.

रेस्टॉरंट

ही अशी जागा आहे जिथं तुम्ही फक्त खाऊ-पिऊ शकता. हवं असल्यास इथले पदार्थ पॅक करून घरी नेऊ शकता. पण कोणत्याही रेस्टॉरंटकडून निवासी सुविधा दिल्या जात नाहीत. हा एकप्रकारचा धाब्यांचाच सुधारीत प्रकार आहे. इथं आपल्याला सर्व्ह करायला नोकरवर्ग असतो. आणि हीच ती जागा आहे जिथं मेक्सिकन, चायनीज, इटालियन, फ्रेंच अशा सर्व प्रकारच्या चवी तुम्हाला चाखायला मिळतात.

कॅन्टीन

कॅन्टीन ही खाण्यापिण्याची अशी जागा आहे जी अॉफीस, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, कारखाने यांच्याशी संलग्न असते. कॅन्टीन असण्याचा मुख्य हेतू असतो कर्मचारीवर्ग कींवा विद्यार्थीवर्गाचा वेळ, पैसा आणि धावपळ कमी करणं. इथं पदार्थही साध्या पध्दतीचे पण अत्यंत कमी दरात मीळतात.

धाबा

रेस्टॉरंटचाच हा एक लहान देसी प्रकार. धाबा हा प्रकार फक्त आपल्याच देशात आहे मंडळी. इथं अत्यंत कमी दरात जेवण उपलब्ध करून दिलं जातं. हे अगदीच आलिशान नसले तरी रात्री उशिरापर्यंत चालू असल्यामुळे प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर ठरतात.

रिसॉर्ट

हा प्रकार या सगळ्यांमध्ये सर्वात आलिशान आहे. रिसॉर्ट्स हे जास्त करून पर्यटनस्थळांच्या ठीकाणीच उपलब्ध असतात. इथं उच्च दर्जाच्या खाण्यापिण्यासोबतच स्पा, स्विमिंग पूल, स्पोर्ट्स, मनोरंजन, शॉपींग अशा हरतऱ्हेच्या आलिशान सुविधा पुरवल्या जातात. हा प्रकार तसा महागडा असल्याने इथं जाणार्‍यांचा खिसाही गरम असला पाहिजे. रोजच्या धावपळीतून वेळ काढून ताण घालवण्यासाठी, मौज करण्यासाठी, आराम घेण्यासाठी आणि मोठ्या सुट्टीचा बेत आखणाऱ्या लोकांसाठी रिसॉर्ट नेहमीच चांगला पर्याय ठरतो.

मंडळी, या सर्वांमधला फरक समजला असेल तर शेअर नक्की करा...

सबस्क्राईब करा

* indicates required