मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

अय्या...चीनमध्ये लहान मुलं घालतात भोक असलेली चड्डी !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
अय्या...चीनमध्ये लहान मुलं घालतात भोक असलेली चड्डी !!

देश कोणताही असो, तिथल्या मातीत पूर्वापार चालत आलेली परंपरा ही असतेच. मग तो देश कितीही प्रगत का असेना. आपल्याच देशाचं बघा ना. आपल्याकडे प्रथा-परंपरांचा नुसता भडीमार आहे. आता परंपरा प्रथा यांच्याबद्दल बोलतच आहोत,  तर चला जाणून घेऊया चायनीज लोक आपल्या मुलांना छिद्र असलेेली चड्डी का घालतात ?

स्रोत

चायनामध्ये एक अजब परंपरा आहे. इथे लहान मुलांना ‘होल वाली चड्डी’ घातली जाते. म्हणजे मागून पूर्णपणे ओपन असलेली चड्डी!! या परंपरेला ‘कई डांग कू’ म्हटलं जातं. चायनीज लोक या परंपरेला आजही एवढे चिकटून आहेत की चीनमध्ये लहानमुलांसाठी होल नसलेली चड्डी मिळणं कठीण आहे. बाहेरून येणाऱ्यांना हा काय प्रकार आहे याचा सहसा पत्ता लागत नाही. आजच्या काळात याचं प्रमाण कमी झालं असलं तरी पूर्णपणे बंद झालेलं नाही.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की हे असं का? तर याचं असं आहे की, मुलांना सुसू आणि शी आली की ती लगेच करता यावी म्हणून अशा चड्डीचा वापर सुरु करण्यात आला. लहान मुलांना शी-शू आली की त्यांचे कपडे काढेपर्यंत त्यांचं काम चड्डीतच झालेलं असतं. (तोंड वाकडं करू नका, तुम्ही पण लहानपणी हेच केलं आहे राव.) त्यामुळे पालक मुलांना होलवाली चड्डी घालून निश्चिंत होतात. पण याचे तोटे देखील आहेत बरं का.

स्रोत

अशाचड्डीमुळे लहान मुलांना मदत होत असली तरी त्यांना कुठेही बसून आपली क्रिया पार पाडण्याची सवय लागते. म्हणजे घाण पसरण्यास एकप्रकारे मदतच होते. संपूर्ण जगात याच गोष्टीवरून चर्चा होत आहे. पण चायनीज लोक याला फारसा विरोध करत नाहीत.

परंपरेला चिकटून राहण्याचं हे आणखी एक उदाहरण.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!
लाइफस्टाइल

अज्रख आणि कलमकारी: रंग वेगळे, पण रंगवण्यामागचं विज्ञान एकच!

कच्छचे अज्रख आणि आंध्र प्रदेशचे कलमकारी या दोन्ही पारंपरिक वस्त्रकलांमागे कोणतं प्राचीन रसायनशास्त्र दडलं आहे? वाचा सविस्तर.

१५ ऑक्टोबर, २०२६

कल्हणकृत राजतरंगिणी आणि काश्मीरच्या राजांचा रंजक प्राचीन इतिहास
लाइफस्टाइल

कल्हणकृत राजतरंगिणी आणि काश्मीरच्या राजांचा रंजक प्राचीन इतिहास

कल्हण पंडितांच्या राजतरंगिणी ग्रंथाच्या आधारे काश्मीरचा प्राचीन इतिहास आणि कर्कोटक वंशातील राजांच्या कारभाराचा रंजक वेध.

२ जून, २०२६

'काला नमक' म्हणजे मीठ नाही, तर बुद्धांचा 'प्रसाद'; सुगंधी तांदळाची गोष्ट
लाइफस्टाइल

'काला नमक' म्हणजे मीठ नाही, तर बुद्धांचा 'प्रसाद'; सुगंधी तांदळाची गोष्ट

अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेला आणि बुद्धांचा प्रसाद मानला जाणारा उत्तर प्रदेशातील सुगंधी 'काला नमक' तांदूळ.

२५ मे, २०२६