व्हिडीओ ऑफ दि डे: एका सिंहाचा हा अंगावर काटा आणणारा लढा लगोलग बघाच!!

मंडळी, आज व्हिडीओ ऑफ दि डे मध्ये पाहूयात एका सिंहाची फिल्मी स्टाईल लढत. फिल्मी का ? याचं उत्तर तुम्हाला व्हिडीओ पाहूनच मिळेल.

मंडळी, व्हिडीओत दिसणारा पहिला सिंह आहे ‘रेड’. तो एकटाच जवळजवळ २० तरसांशी लढताना दिसतोय. सुरुवातीला तो त्यांच्यावर मात करतो पण पुढे त्याची शक्ती कमी पडते. चारीबाजूने त्याच्यावर हल्ला झाल्याने तो आता धारातीर्थी पडणार की काय अशी शक्यता निर्माण झाली होती, मग तेवढ्यात त्याच्या मदतीला आला दुसरा सिंह. त्याचं नाव टाटू. नवीन दमाच्या टाटूने येऊन सगळ्या तरसांची पळता भुई थोडी केली. 

हिंदी सिनेमांमध्ये दोन हिरो मित्र जेव्हा गुंडांशी लढतात तेव्हा अशाच प्रकारचा सीन घडतो. नाही का?

BBC Earth ने आपल्या समोर हा व्हिडीओ आणला आहे. ११ नोव्हेंबर पासून BBC Earth वर “Dynasties” नावाची डॉक्युमेंटरी मालिका सुरु झाली आहे. यात ५ प्रकारच्या प्राण्यांचं आयुष्य दाखवलं जाणार आहे. चिंम्पाजी, पेंग्विन, सिंह, लांडगा, वाघ हे ते ५ प्राणी. यापैकी सिंहावरील भागात हा प्रसंग दाखवण्यात आला. असेच आणखी काही प्रसंग या भागात दाखवण्यात आले होते. एका प्रसंगात तर टाटू आणि रेड मिळून चक्क हिप्पोपोटॅमसची शिकार करायला जातात राव. हिम्मत तरी बघा !!

चला तर जास्त वेळ न दवडता तुम्ही हा जबरी व्हिडीओ पाहून घ्या.

 

 

आणखी वाचा :

हैदराबाद मधला हा दारुडा गेला सिहांशी शेक हँड करायला

व्हिडीओ ऑफ दि डे : चक्क पर्यटकांना मिठ्या मारणारा सिंह बघितलाय का कधी ?

बा अदब! बा मुलाहिजा! होशीयार!! वनराज सिंह आणि कुटुंब रस्ता पार करत आहेत!!

सबस्क्राईब करा

* indicates required