computer

व्हॉट्सअॅप वर डार्क मोड आलं भाऊ....डार्क मोडचा उपयोग आणि तो ऑन कसा करायचा, शिकून घ्या !!

जवळजवळ सगळ्याच  वेबसाईट  आणि अॅप्सवर डार्क मोड आलेला आहे. व्हॉट्सअॅपवर डार्क मोड कधी येणार याची सगळेच  वाट पाहत होते. काल अखेर व्हॉट्सअॅपने डार्क मोड आणलंच. आता तुम्ही अॅपल आणि अँड्रॉइड फोन्सवर व्हॉट्सअॅपचं डार्क मोड वापरू शकता.

पण हा डार्क मोड ऑन कसा करायचा? डार्क मोडचा उपयोग काय असतो?

तर, डार्क मोड ऑन करण्यासाठी सर्वात आधी तुमचा व्हॉट्सअॅप अपडेट करून घ्या. त्यासाठी अँड्रॉइड युझर्सनी गुगल प्लेस्टोरमध्ये जाऊन व्हॉट्सअॅप अपडेट करा. जर तुम्हाला अपडेट करता येत नसेल तर हरकत नाही. याचा अर्थ तुम्हाला थोडी वाट पहावी  लागेल. व्हॉट्सअॅपने अधिकृतपणे म्हटलंय की डार्क मोड फिचर टप्प्या टप्प्याने सर्व मोबाईल फोन्सवर उपलब्ध होईल.

तुम्ही जर व्हॉट्सअॅप अपडेट केलं असेल तर आता पुढच्या स्टेप्सकडे वळूया. अँड्रॉइडच्या ९ आणि त्या खालील व्हर्जन्ससाठी स्टेप्स वेगळ्या आहेत, त्या आधी पाहू.

१. व्हॉट्सअॅपच्या उजव्या कोपऱ्यातील तीन ठिपक्यांवर क्लिक करा.

२. सेटिंगवर क्लिक करा.

३. Chats च्या पर्यायावर क्लिक करा.

४. सुरुवातीलाच Theme चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून Dark ची निवड करा.

या स्टेप्स केल्यानंतर व्हॉट्सअॅपचा कायापालट होईल. पुन्हा लाईट मोडमध्ये बदल करण्यासाठी वरील स्टेप्स पुन्हा फॉलो करा.

अँड्रॉइड १० व्हर्जनवर डार्क मोड ऑन करण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाण्याची गरज नाही. त्यासाठी पुढील सोप्या स्टेप्स आहेत.

१. फोन सेटिंगमध्ये जा.

२. खाली Display & Brightness चा पर्याय दिसेल.

३. Display & Brightness मध्ये जाऊन डार्कमोडवर क्लिक करा.

अॅपल फोन्सवर डार्क मोड कसा मिळवाल?

अॅपल फोन्सवर डार्क मोड मिळवण्यासाठी अॅप स्टोरवर जाऊन व्हॉट्सअॅप अपडेट करा आणि अँड्रॉइड १० च्याच स्टेप्स फॉलो करा.

डार्क मोडचा उपयोग काय?

डिजिटल विश्वात डार्क मोडला फार महत्त्व आहे. अंधारात पूर्ण ब्राईटनेस असलेला मोबाईल वापरल्यास डोळ्यांवर ताण येतो, डोळे दुखू लागतात, डोळ्यातून पाणी येतं. म्हणून डार्क मोड उपयोगी पडतो. पूर्णपणे काळा बॅकग्राउंड असल्याने डोळ्यांना उजेडाचा त्रास होत नाही. शिवाय परीक्षणातून असं दिसून आलं आहे की डार्क मोडमुळे बॅटरी लाईफ वाढते. व्हॉट्सअॅपचा वापर बघता डार्क मोड अत्यावश्यक होता. आता तुम्हाला चादरीच्या आत व्हॉट्सअॅप वापरताना त्रास होणार नाही.

तर मंडळी, चला तर लगेचच हे फिचर वापरून पाहा.

सबस्क्राईब करा

* indicates required