computer

नवं पॅनकार्ड बनवा, जुन्यामधली माहिती अपडेट करा आणि तेही घरबसल्या !!

मंडळी, पॅनकार्डचा समावेश महत्वाच्या कागदपत्रांमध्ये होतो. पॅनकार्डच्या आधारे आपली अनेक कामे होतात कारण त्यात आपली संपूर्ण माहिती दडलेली असते. पण समजा ही माहिती आपल्याला बदलायची असेल तर काय करावं ? किंवा पॅनकार्ड हरवला असेल तर काय करणार ? साहजिकच कागदपत्रांची जुळवाजुळव करून पॅनकार्डचं ऑफिस गाठावं लागेल. पण हे काम आता तुम्ही घर बसल्याही करू शकता. 
पॅनकार्डवर असलेलं नाव किंवा माहिती बदलण्यासाठी अथवा नवीन पॅनकार्ड मागवण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही हे काम ऑनलाईन देखील करू शकता. पण कसं ? चला आज आम्हीच तुम्हाला सांगतो....

पॅनकार्डवर मध्ये बदल करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्र असणं गरजेचं आहे :
१. स्थानिक निवासाचा पुरावा
२. जन्माचा दाखला
३. ओळखपत्र 

हे कागदपत्र तयार असतील तर पुढील प्रक्रिया खालील प्रमाणे असेल :

१.

पॅनकार्डवर मध्ये बदल करण्यासाठी तुम्ही NSDL किंवा UTITSL या दोन वेबसाईट वर जाऊ शकता. यापैकी NSDL वेबसाईट वरून तुम्ही कशा प्रकारे पॅनकार्ड अपडेट करू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

२.

Application या लिंक वर क्लिक करा. तुमच्या समोर दोन पर्याय दिसतील. Application Type आणि Category. 

३. Application Type वर क्लिक केल्यानंतर तीन पर्याय येतील.

१. नवीन पॅनकार्ड बनवण्याचा अर्ज.
२. परदेशी नागरिकासाठी पॅनकार्ड बनवण्याचा अर्ज.
३. सध्या वापरात असलेल्या पॅनकार्ड मध्ये बदल किंवा नव्याने मागवायचा असेल तर भरायचा अर्ज

दुसरा पर्याय म्हणजे Category. या पर्यायात तुम्ही पॅनकार्डचा अर्ज कोणासाठी करत याबद्दल विविध पर्याय असतील.

४. वरील पर्यायांमधले योग्य पर्याय निवडल्यानंतर तुमची सर्व माहिती भरा. माहिती भरल्यानंतर Submit या बटनावर क्लिक करा. 

५. Submit वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पर्याय दिसेल. पॅनकार्ड मध्ये बदल करण्यासाठी लागणारे कागदपत्र तुम्ही कोणत्या प्रकारे देऊ शकता याबद्दल ४ पर्याय दिलेले असतील.

१. Physical Application २. Digital Signature ३. e-Sign ४. e-KYC 
या चारपैकी e-KYC  ची निवड करा. e-KYC  मुळे तुम्ही आधारकार्ड द्वारे तुमची माहिती पाठवू शकता.

६. यानंतर लाल रंगातील स्टार असलेल्या सगळ्या जागांमध्ये तुमची माहिती भरा.

७. e-KYC पर्यायात आधारकार्ड मध्ये असलेली माहिती वापरली जात असल्याने तुम्ही भरलेली माहिती आणि आधारकार्ड वर असलेल्या माहिती मध्ये साम्य असायला हवं.

८. खालील पुराव्यांसाठी लागणारी कागदपत्रांची निवड करा.

१. स्थानिक निवासाचा पुरावा
२. जन्माचा दाखला
३. ओळखपत्र 

९. आता तुमच्या समोर फी भरण्याचा पर्याय येईल. पॅनकार्ड मधली माहिती दुरुस्त किंवा नव्याने पॅनकार्ड मागवण्यासाठी तुम्हाला १५० रुपये आकारले जातील.

१०. तुम्हाला तुमची फी ऑनलाईन भरण्यासाठी पर्याय दिले जातील. त्याप्रमाणे फी भरल्यानंतर तुम्हाला reference number आणि transaction reference number मिळेल.

११. त्यानंतर तुम्हाच्या आधारकार्ड वर असलेली माहिती आणि तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे कि नाही हे तपासून पाहिलं जाईल. त्यासाठी Authenticate वर क्लिक करा.

१२. तुम्ही दिलेली माहिती बरोबर असेल तर Continue with e-Sign / e-KYC. पर्यायावर क्लिक करा.

१३. Generate OTP वर क्लिक करा. तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक कोड येईल. तो कोड दिलेल्या रकान्यात भरून Submit वर क्लिक करा. इथे संपूर्ण प्रक्रिया संपते.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अर्ज दाखवला जाईल. हा अर्ज तुम्ही PDF फॉरमॅट मध्ये डाऊनलोड करू शकता. यानंतर तुमचा नवीन पॅनकार्ड तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल.

तर, अशा प्रकारे तुम्ही तुमचा पॅनकार्ड घर बसल्या अपडेट करू शकता किंवा नवा मागवू शकता.

सबस्क्राईब करा

* indicates required