इंटरनेट नसतानाही असे करा UPI पेमेंट व्यवहार!!
आता गुगलपे, पेटीएम, फोनपे अशा सगळ्या UPI सिस्टिम्स आपल्या अंगवळणी पडल्या आहेत. पण तुम्हाला माहित आहे का UPI पेमेंट आपण इंटरनेटशिवाय देखील करू शकतो?
बऱ्याचदा असं होतं की मोबाईल डेटा नसेल तर आपण कॅश पेमेंट करतो. कारण आपल्याला माहीत नसते की UPI पेमेंटसाठी अजून एक पर्याय आहे. फार सोप्या पद्धतीने हा व्यवहार करता येतो. खूपदा असे घडते की आपण जिथे असतो त्या ठिकाणी इंटरनेट स्पीड खूपच मंद असतो किंवा नेटवर्क खूप खराब असते. अशा परिस्थितीत UPI पेमेंट करणे अवघड होते. इंटरनेटशिवाय ऑफलाइन UPI पेमेंटही करता येते, ते सुद्धा तुमच्या मोबाईल फोनवरून सहज. आज आम्ही त्याबद्दल माहिती सांगणार आहोत.
सर्वात प्रथम UPI म्हणजे काय, हे समजून घेऊयात.
यूपीआय म्हणजे युनिफाइड पेमेंट इंटरफेस. ही डिजिटल पेमेंट पद्धत आहे जी मोबाईल ॲपद्वारे करता येते. उदाहरणार्थ Paytm, GPay, Phonepe, Amazon pay असे बरेच आहेत. तुम्ही या ॲपद्वारे सुरक्षित मार्गाने पेमेंट करू शकता. याद्वारे कधी पैसे भरायला अडचण जरी आली तरी ते बँक खात्यात परत मिळतात. UPI द्वारे तुम्ही बिल भरू शकता ,नातेवाईकांना किंवा मित्रांना ऑनलाईन पैसे पाठवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करावे लागेल आणि तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असावा. जर मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला नसेल आणि जर तुम्हाला त्या नंबरवरून UPI पेमेंट करायचे असेल तर ते यशस्वी होणार नाही.
99# या नंबरवर ही सेवा इंटरनेटशिवाय उपलब्ध आहे. 99# ही सेवा 12 भाषांत उपलब्ध असते, योग्य भाषेचा पर्याय तुम्हाला निवडता येतो. तसेच महत्वाच्या सर्व 41 बँका याच्याशी सलग्न आहेत. *99# ही सेवा 24 तास आणि सुटीच्या दिवशीही चालू असते. यासाठी तुम्ही रजिस्टर करू शकता, यासाठी अगदी किरकोळ किंमत तुम्हाला टेलिफोन ऑपरेटरला तुम्हाला भरावी लागते. ती भरल्यावर ही या सेवेचा लाभ तुम्ही घेऊ शकता.
इंटरनेट शिवाय म्हणजे ऑफलाइन UPI पेमेंट करायचे असल्यास खालील पद्धतीने ते करू शकता.
1- सर्वप्रथम फोन डायलरवर जा, येथे *99# टाइप करा. नंतर कॉल बटण दाबा.
2- तुमच्या स्क्रीनवर एक पॉप-अप मेन्यू दिसेल, तिथे अनेक पर्याय दिसतील. तुमच्या गरजेनुसार यांपैकी कोणताही पर्याय निवडा. त्याच्याशी संबंधित क्रमांक टाका आणि पाठवा वर क्लिक करा
3- आता ज्या पर्यायातून तुम्हाला UPI द्वारे पैसे पाठवायचे आहेत तो निवडा. जर तुम्हाला मोबाईल नंबरद्वारे रिसीव्हरला पैसे पाठवायचे असतील तर तो पर्याय निवडा आणि मोबाईल नंबर टाका
4- आपण प्राप्तकर्त्याला पाठवू इच्छित असलेली रक्कम प्रविष्ट करा आणि 'पाठवा' बटण दाबा
5- तिथे कमेंट किंवा टीप तुम्हांला लिहायला सांगितले जाते. त्यात तुम्ही तुमचे नाव किंवा कुठल्या बाबतीत पैसे पाठवले आहेत याबद्दल लिहू शकता.
6- त्यानंतर तुम्हाला व्यवहार पूर्ण करण्यासाठी UPI पिन टाकावा लागेल. हे झाल्यानंतर तुमचा व्यवहार यशस्वी होईल.
यासाठी कोणत्याही इंटरनेटची आवश्यकता नाही. त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे कापल्याचा त्वरित मेसेज येईल. बँक खात्यातून रक्कम काढली गेल्यास बँकेकडून मेसेज येतोच. जर तो आला नाही तर खात्यावर किती शिल्लक आहे हे तुम्ही तपासू शकता. जर तुम्ही Google Pay द्वारे UPI पेमेंट केले तर यासाठी तुम्हाला Google Pay उघडावे लागेल. वरच्या उजवीकडे तुमच्या बँक खात्यावर टॅप करा. ज्या खात्याची शिल्लक आपण तपासू इच्छित आहात त्यावर टॅप करा. आणि आपला UPI पिन एंटर करा. हे तुमच्या खात्यातील शिल्लक दाखवेल.
ही माहिती उपयुक्त वाटल्यास जरूर शेयर करा.
शीतल दरंदळे