computer

१०० वर्ष जुन्या जगातील सगळ्यात मोठ्या माहिती-तंत्रज्ञान कंपनीचं नेतृत्व एक भारतीय करणार !!

जगातील सगळ्यात मोठ्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असलेल्या IBM (International Business Machines Corporation) च्या प्रमुखपदी (CEO) एक भारतीयाची निवड झालेली आहे. त्यांचं नाव आहे अरविंद कृष्णा. पण कोण आहेत हे अरविंद कृष्णा? चला तर जाणून घेऊ.

अरविंद कृष्णा यांचे वडील सेनाधिकारी होते. अरविंद यांनी सेनेत न जाता आयआयटी कानपूर येथून पदवी मिळवली. अमेरिकेच्या अर्बाना येथील ‘युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय’ येथून पीएचडी मिळवली आहे. या दोन्ही विद्यापीठाकडून त्यांना ‘माजी विद्यार्थी पुरस्काराने’ गौरवण्यात आलं आहे.

IBM च्या प्रमुख पदावर आल्यानंतर त्यांच्याकडे महत्त्वाच्या ‘क्लाऊड आणि डेटा प्लॅटफॉर्म’ची जबाबदारी असणार आहे. याखेरीज कंपनीचं धोरण आखणे, प्रोडक्ट डिझाईन, मार्केटिंग अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही त्यांच्यावर असतील. भविष्यात येणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्यूटिंग, क्लाऊड प्लॅटफॉर्म सर्व्हिसचं धोरण आखण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असेल.

अरविंद कृष्णा यांनी IBM ला मिळवून दिलेलं सर्वात मोठं यश म्हणजे Red Hat या  सॉफ्टवेअर कंपनीची खरेदी. तब्बल ३४०० कोटी डॉलर्स एवढ्या रकमेत Red Hat कंपनीला IBM ने विकत घेतलं आहे. IBM च्या १०८ वर्षाच्या इतिहासात हा सर्वात मोठा व्यवहार आहे.   

 

तर, सुंदर पिचई, सत्या नादेला यांच्यानंतर आता आणखी एक भारतीय जगातल्या एका महत्त्वाच्या कंपनीच्या प्रमुखपदी विराजमान होतोय.  हे आपल्या भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.

 

सबस्क्राईब करा

* indicates required