तुम्ही टॉम अँड जेरीचे फॅन आहात? मग तुम्हाला टॉम अँड जेरीबद्दल या गोष्टी माहित आहेत का?
१९४० साली आलेल्या टॉम अँड जेरी या मालिकेनेA0 एक-दोन नाही, तर तब्बल तीन पिढ्यांचे बालपण घडवले आहे. जोसेफ बार्बरा आणि विल्यम हना यांनी उंदीर आणि माजरांचे भांडण दाखवणारी कार्टून सिरीज निर्माण केली. कदाचित त्यावेळी त्यांनासुद्धा वाटले नसेल की ही मालिका पुढे चालून केवढा मोठा इतिहास घडवणार आहे. मात्र टॉम अँड जेरी एवढी लोकप्रिय कार्टूनसिरीज असूनदेखील तिच्याबद्दल बऱ्याच लोकांना कित्येक गोष्टी अजूनही माहीत नाहीत. अशाच काही गोष्टी आज आम्ही सांगणार आहोत.
एवढ्या वर्षांनंतरसुद्धा आपल्याला टॉम अँड जेरी नक्की कुणाच्या डोक्यातून आलेली कल्पना आहे माहीत नाही. जोसेफ बार्बरा आणि विल्यम हना यांनी या सिरीयलची निर्मिती केली आहे. त्यांनी फक्त टॉम अँड जेरीची निर्मिती केली नाहीय, तर सोबतच योगी बेअर, टॉप कॅट, स्कुबी डू, द स्मर्फ्स, द फ्लिंटस्टोन्स या आणि अशा अनेक मालिकांचे निर्माते तेच होते.
टॉम अँड जेरीचा पहिला एपिसोड १९४० साली प्रसिद्ध झाला. या पहिल्या एपिसोडचे नाव पूस अँड बूट असे होते. हा पहिला एपिसोड सर्वात लांब समजला जातो. १९४० ते २०१४ या कालावधीत टॉम अँड जेरीचे १६४ एपिसोडस तयार झाले.
आपल्याला टॉम अँड जेरी जरी नेहमी भांडताना दिसतात. तरी त्यांचे नाते नेहमीच तसे राहिले नाहीय. १९७५ च्या सुमारास ते चांगले मित्र झाले होते. एवढंच नाहीतर जगभर फिरून स्पोर्ट्स इव्हेंट्समध्ये भाग घेणे, विविध रहस्ये सोडवणे अशी कामे देखील ते करत असत. पण त्यांची ही मैत्री काही जास्त दिवस टिकली नाही.
तुम्हाला टॉम अँड जेरीचा शेवट कसा झाला माहीत आहे? आयुष्यभर जगाला हसवणाऱ्या या सिरीयलचा अंत दुःखद आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये टॉम आणि जेरी दोघे एका रेल्वे ट्रॅकवर चक्क एकमेकांचा जीव घेतात.
या सिरीयलचे टायटल हे १९२३ साली आलेल्या एका पुस्तकावरून घेण्यात आले होते. त्या पुस्तकाचे नाव होते, Life in London or the adventures of Jerry howthone and his elegant friend Corinthian tom.
तुम्हाला माहीत नसेल पण टॉम अँड जेरीची अजून एक जोड सिरीयल होती. १९५० च्या दशकात ती आली होती. पण स्टुडिओ बंद झाला आणि फक्त २ एपिसोडस नंतर सिरीयल बंद करण्यात आली. एक बैल आणि त्याच्या मुलाच्या खट्याळपणावर आधारित ही सिरीयल होती.
अमेरिकेत पारंपरिक ख्रिसमस कॉकटेल तयार करण्यात येते. त्यापैकी एकाचे नाव टॉम अँड जेरी होते. रम आणि एग्नोगच्या मिश्रणातुन हे कॉकटेल तयार करण्यात येत असे. बुक लाईफ नावाचे पुस्तक लिहिणारा लेखक पियर्स इगन याने ते कॉकटेल तयार केले होते.
टॉम अँड जेरीच्या महत्वाच्या फॅक्टसमधून कदाचित हे सर्वात महत्वाचे असेल, टॉम अँड जेरीचे दोन्ही निर्माते आधी MGM स्टुडिओसोबत काम करत होते आणि आधी त्यांनी ही सिरीयल सुरू करण्याचा प्रस्ताव याच स्टुडिओला दिला होता. पण त्यांनी ही संकल्पना खूप कॉमन झाली म्हणून ती नाकारली. पुढे या संकल्पनेचं काय झाले हे सर्वांना माहीत आहेच. पहिल्याच वर्षी टॉम अँड जेरीचे ऑस्करसाठी नामांकन झाले होते.
१९९० च्या दशकात टॉम अँड जेरीला नवे रूप देण्यासाठी या सिरीयलमध्ये एक बदल करण्यात आला होता. यात प्रीक्वल म्हणजेच त्यात टॉम अँड जेरीचे आधीचे दिवस दाखवण्यात आले होते.
सगळ्यांना माहीत आहे की ही सिरीयल अमेरिकन आहे. पण १९६० च्या दशकात १३ एपिसोड हे झेकोस्लेवाकीया या देशात तयार करण्यात आले होते. त्यांच्या बोलण्याच्या टोनमधून सहज ही गोष्ट कळते, तसेच नेहमीपेक्षा या एपिसोडसमध्ये जास्त मारधाड दाखवली आहे.
जोसेफ बार्बराने आपले करियर हे खऱ्या टॉम अँड जेरीसोबत सूरू केले होते. पुढे जाऊन त्याने १९३७ साली MGM स्टुडिओसोबत काम सुरू केले तिथेच त्याला त्याचा सहकारी विल्यम हना भेटला.
एवढ्या वर्षांमध्ये टॉम अँड जेरी बोटावर मोजता येतील एवढयाच वेळा एकेमेकांसोबत बोलले आहेत. पहिल्यांदा १९९० साली एक सिनेमात गाणे म्हणण्यासाठी ते बोलले होते. Is you or is you ain't my baby असे ते शब्द होते.
टॉम अँड जेरीचे आजवर १३ वेळा कार्टून प्रकारातून ऑस्करसाठी नामांकन झाले आहे. त्यापैकी ७ वेळा त्यांनी ऑस्कर जिंकलं आहे. पहिल्यांदा १९४३ साली यांकी डुडल माऊससाठी तर सातव्यांदा १९५३ साली योहान माऊस या एपिसोडसाठी पुरस्कार मिळाला होता. टॉम अँड जेरी फिवरपासून नासासुद्धा स्वत:ला दूर ठेऊ शकले नाही. एकमेकांच्या पाठलाग करणाऱ्या दोन सॅटेलाइट्सना टॉम आणि जेरी असे नाव देण्यात आले आहे.
टॉम अँड जेरी ही या उंदीर-मांजराची नावं सुरुवातीपासून हीच नव्हती. टॉमचे नाव आधी जास्पर होते तर जेरीला नावच नव्हते. निर्मात्यांनी स्वतःच्या सोयीसाठी त्याला जिंक्स मानले होते.
टॉम अँड जेरी हे नाव कसे दिले याची गोष्टसुद्धा रंजक आहे. या दोघांची नावं ठरवण्यासाठी एक स्पर्धा ठेवली गेली होती. जिंकणाऱ्याला ५० डॉलरचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. जॉन कार नावाच्या ऍनिमेटरने ही नावे दिली आणि सोबतच ५० डॉलर सुद्धा जिंकले.
यातल्या किती गोष्टी तुम्हांला माहित होत्या? तुम्हांलाही या तुमच्या आवडत्या कार्टून सिरीजबद्दल काही हटके माहिती असेल तर आमच्यासोबत नक्की शेअर करा.