शर्टावर दिसणारा हा फास फक्त डिझाईनसाठी नाही... बघा त्याचा उपयोग काय आहे

अॉफीसवाली मंडळी... तुमच्यासाठी तुमचा शर्ट म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याची गोष्ट. त्याला स्वच्छ आणि नीटनेटका ठेवणं, सतत इस्त्री करणं, सगळं कसं अगदी लक्ष देऊन करता तुम्ही. बरोबर आहे, शेवटी तुमची इमेज तो शर्टच मेन्टेन करत असतो. असो...

तुमच्या बहूतांश शर्टच्या मागच्या बाजूला तुम्हाला एक लूप दिसेल. पण तो कशासाठी असतो? याचा विचार मात्र आपल्यापैकी कोणीच केला नसेल. आपण सगळे आज इस्त्री केलेला शर्ट कपाटात हँगरला लटकवून ठेवतो. पण पूर्वी प्रत्येकाकडे अशी कपड्यांसाठी कपाटं नव्हती. अशावेळी या शर्टची इस्त्री खराब होऊ नये म्हणून हा फास दिला जायचा. ज्यामुळे शर्ट तसाच अडकून ठेवता येईल आणि त्यावर घड्याही पडणार नाहीत किंवा तो चुरगाळलाही जाणार नाही. 

असे फास असलेले शर्ट १९६० मध्ये अॉक्सफर्ड बटन डाऊन शर्ट्स या कंपनीनं पहिल्यांदा तयार केले होते. त्यानंतर त्याची उपयुक्तता पाहून इतर कंपन्यानीही शर्टला हा लूप लावायला सुरूवात केली. मात्र आता या लूपला फक्त एक डिझाईन समजलं जातं.

माहिती आवडली ? मग करा शेअर !!

सबस्क्राईब करा

* indicates required