मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

सायकलवरून फक्त ७९ दिवसात पूर्ण केली पृथ्वीप्रदक्षिणा....वाचा कसा पार पडला हा प्रवास !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
सायकलवरून फक्त ७९ दिवसात पूर्ण केली पृथ्वीप्रदक्षिणा....वाचा कसा पार पडला हा प्रवास !!

'मार्क बेमाउन्ट' या पठ्ठ्यानं तब्बल ७९ दिवसात संपूर्ण जगाची सफर केली आहे राव. पूर्वीचा रेकॉर्ड हा १२३ दिवसांचा होता पण या बहाद्दराने ४४ दिवसाआधीच हा रेकॉर्ड तोडलाय. भौ, मानलं याला !!


स्रोत

तब्बल २८,९६८ किलोमीटरचा हा प्रवास होता. मंडळी हे अंतर इतक्या कमी दिवसात पार करण्यासाठी मार्कला सतत  १६ तास सायकल चालवावी लागली. तो रात्री फक्त ५ तास झोपायचा, सकाळी ४ वाजता त्याचा प्रवास सुरु व्हायचा. हा प्रवास शारीरिक आणि मानसिकरीत्या खूप ‘चॅलेंजिंग’ असल्याचं तो म्हणतो.


स्रोत

मार्कने २ जुलै रोजी पॅरिसमधून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. युरोप, रशिया, मंगोलिया, चायना, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधून त्याने थेट उत्तर अमेरिकेतून पोर्तुगाल, स्पेन आणि मग फ्रांस असा प्रवास पूर्ण केला.

"माझ्या मनासाठी आणि शरीरासाठी हे खूप मोठं आवाहन होतं" असं मार्क म्हणतो. विविध प्रदेश आणि तिकडचं बदलतं हवामान आणि त्यात सतत प्रवास करणे ही सोप्पी गोष्ट नव्हती. अश्या कामांसाठी लागणारा संयम, जिद्द आणि चिकाटी त्याच्या अंगी ठासून भरली आहे. यात शंकाच नाही. या त्याच्या कामगिरीने त्याने २ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव कोरलं आहे.


स्रोत

मार्कने या आधी पूर्ण स्कॉटलंडचा प्रवास एका दिवसात पूर्ण केला होता. त्यानंतर २२ वर्षांनी त्याने संपूर्ण जगाचा प्रवास केला.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइल१० वी - १२ वी चे मार्कं म्हणजे आयुष्य नाही! विनीत नायर यांचा तो 'व्हायरल' संदेशबोर्डाच्या परीक्षेचे टेन्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी HCL चे माजी सीईओ विनीत नायर यांचा डोळे उघडणारा संदेश.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

साम्राज्यांचा उदय आणि अस्त: इब्न खल्दून यांची 'साम्राज्य चक्र' संकल्पना
लाइफस्टाइल

साम्राज्यांचा उदय आणि अस्त: इब्न खल्दून यांची 'साम्राज्य चक्र' संकल्पना

समाजशास्त्राचे जनक मानले जाणाऱ्या इब्न खल्दून यांनी मांडलेली साम्राज्यांच्या विनाशाची पाच टप्प्यांची संकल्पना आजही कशी लागू पडते?

१९ एप्रिल, २०२६

६० वर्षांचे चक्र आणि 'पराभव' संवत्सराचा अर्थ
लाइफस्टाइल

६० वर्षांचे चक्र आणि 'पराभव' संवत्सराचा अर्थ

भारतीय कालगणनेतील ६० वर्षांचे 'बृहस्पती चक्र' आणि २०२६ मध्ये सुरू होणाऱ्या 'पराभव' संवत्सराचा नेमका अर्थ आणि महत्त्व काय?

२० मार्च, २०२६